वेल्हे : महाराष्ट्राला खूप मोठा ऐतिहासिक वारसा लाभला आहे. परकीय गुलामगिरीतून मुक्ती मिळवण्यासाठी व स्वराज्याची निर्मितीचे बळ हे याच गडकिल्ल्यांमधून मिळाले होते. छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्य, स्वातंत्र्य याची मशाल पेटवली. इतकंच नाही तर हिंदवी स्वराज्याची निर्मिती देखील केली. त्या भव्य ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार असलेले गड-किल्ले आजही महाराष्ट्रात, सह्याद्रीच्या कणखर दगडांच्या आधारावर उभे आहेत. मात्र, अनेक किल्ल्यांकडे दुर्लक्ष झाल्याने ते भग्न अवस्थेत अंतिम घटका मोजत आहेत.
गेल्या काही वर्षांमध्ये गड-किल्ल्यांवर पर्यटन करणाऱ्यांची संख्या हि प्रचंड वाढली आहे. यामुळे गड-किल्ल्यांचे संवर्धन करणाऱ्या व पहारा देणाऱ्यांचा ताण वाढला आहे. काही पर्यटक हे इतिहासाचं महत्व जाणून पुढच्या पिढीमध्ये देखील आपला गौरवशाली इतिहास रुजवण्याचे काम करत असले तरी अतिउत्साही आणि ऐतिहासिक नासधूस करणाऱ्या पर्यटकांचा हैदोस देखील वाढत आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याच तोरण ज्या किल्ल्याला काबीज करून बांधलं त्या ‘तोरणा’ किल्ल्यावर संतपजनक घटना समोर आली आहे. बुधलामाचीकडे जाणा-या कोकण बुरुजाचे दगडी पाडून नासधुस केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. किल्ल्यावरील पुरातत्व खात्याचे किल्लेदार बापु साबळे हे सकाळी किल्ल्यावर पाहणी करत असताना हे घडल्याचे निदर्शनास आले. कोरोना कालावधीमध्ये संचारबंदी असताना देखील रविवार व शिवराज्याभिषेक दिनाचं औचित्य साधून राजगडासह तोरणा किल्ल्यावर शेकडो पर्यटकांनी हजेरी लावली. या किल्ल्यांवर यायला अनेक वाटा असल्याने पर्यटक सुट्टीच्या दिवशी या किल्ल्यांवर येत असतात.
यामध्ये असणाऱ्या काही उपद्रवी पर्यटकांनी केलेलं संतापजनक कृत्य समोर आलं आहे. शनिवारी (५ जून) रोजी शंभर-दीडशे पर्यटक हे तोरणावर आले होते. यावेळी काही पर्यटक हे रात्री मुक्कामी राहिले होते. अशी माहिती किल्लेदार बापु साबळे यांनी दिली. शनिवारी ते पाहणी करून आले असता किल्ला सुस्थितीत होता. काल सकाळी गडाची पाहणी करताना बुधला माचीकडे जाणारा कोकण दरवाज्या मार्गावरील कोकण बुरुजाच्या दगडी, तसेच पायाखालील दगडी फरश्या, उभ्या भिंतीच्या दगडी उपद्रवी पर्यटकांनी पहारीच्या सहाय्याने पाडल्या असल्याचे निर्दर्शनास आले. याबाबत पुरातत्व विभागाचे सहाय्यक संचालकांना याबाबत माहिती दिली असल्याचे साबळे यांनी सांगितले. ही घटना उघडकीस आल्यानंतर आता संताप व्यक्त केला जात आहे. तर, येणाऱ्या पर्यटकांची नोंद केली जावी अशी मागणी काही स्थानिकांनी केली आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘साराभाई व्हर्सेस साराभाई’ फेम अभिनेत्री तरला जोशी यांचे निधन
- ‘ब्लू टीक’ पेक्षा लोकांच्या लसीकरणाकडे लक्ष द्या: मलिकांनी फटकारले
- ‘सरकारने घालून दिलेल्या सर्व नियमाचे पालन जनतेने केल्याने कोरोना रुग्ण संख्या आटोक्यात येतेय’
- चोराच्या उलट्या बोंबा : मी उपचारासाठी देश सोडला; पळून गेलेलो नाही – चोक्सी
- 12 ते 18 वर्ष वयोगटातल्या मुलांवरील कोरोना लसीच्या चाचणीला राज्यात प्रारंभ


