जालना: कोरोना काळात सर्वाधिक मदत ही केंद्र सरकारकडून झाली असून राज्यसरकार पूर्णपणे अपयशी ठरल्याचा दावा केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी भाजपा जिल्हा कार्यकारिणी बैठकीत केला. भाजपा जिल्हा कार्यकारणी व जिल्ह्यातील प्रमुख प्रदेश पदाधिकारी, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य व प्रमुख पदाधिकाऱ्यांची झूम ॲपद्वारे बैठक झाली. या वेळी बैठकीत मंत्री दानवे बोलत होते.
या वेळी भाजपा पदाधिकारी यांना झूम ॲपद्वारे मार्गदर्शन करताना मंत्री रावसाहेब दानवे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली लसीकरणात २० कोटीचा टप्पा गाठणारा भारत हा जगातील दुसरा क्रमांकाचा देश असून, कोरोना विरोधी लढ्यात भारतात राबविल्या जात असलेल्या लसीकरण मोहीम अंतर्गत २० कोटी चा दुसरा टप्पा बुधवारी पार केला असून, अवघ्या १३० दिवसात भारताने ही कामगिरी करून दाखवली. राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोरोना रोखण्यात संपूर्ण अपयशी ठरल्याचा दावा केंद्रीय मंत्री दानवे यांनी बैठकीत केला.
आरोग्य मंत्र्याच्या जिल्ह्यातच आरोग्य यंत्रणेचे तीनतेरा वाजले आहेत. त्यामुळे भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी ३० मे रोजी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील ५० गावांमध्ये कोरोना रोखण्यासाठी व त्यावर उपाययोजना करण्यासाठी मास्क, सॅनिटायझर वाटप करणे, रक्तदान शिबिराचे आयोजन करणे, कीट वाटप करणे आदी कार्यक्रम भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी राबविण्याचे आवाहन यावेळी आमदार संतोष दानवे यांनी केले.
महत्वाच्या बातम्या
- ICCच्या नियमावलीनं गोंधळला वासिम जाफर ; म्हणाला…
- दारूबंदी : ‘जे मुख्यमंत्री जिजाऊंचे नाव घेणारे आहेत त्यांच्याकडून तरी अशी अपेक्षा नव्हती’
- ‘या’ प्रमुख कारणांमुळे चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी राज्य सरकारने उठवली
- चक्क!! मिलिंद सोमण सोबत सेल्फी काढण्यासाठी महिलेने साडीमध्येच मारले पुशअप्स
- रस्ता रोको, जेलभरो इतकेच काय महिलांनी मुंडण करून केलेली दारूबंदी ठाकरे सरकारने एका झटक्यात उठवली !
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

