मुंबई : अभिनेता मिलिंद सोमण बऱ्याचदा सोशल मीडियावर त्याचे वर्कआऊट करतानाचे व्हिडीओ आणि फोटो शेअर करत असतो.त्याच्या फिटनेसच्या बाबत नेहमीच चर्चा होत असते. आजही तो एखाद्या तरुणाला लाजवेल असे फिट राहण्यासाठी प्रयत्न करत असतो. एखादा सेलिब्रिटी म्हंटल की अनेक लोक सेल्फी काढण्यासाठी उत्सुक असतात. मिलिंद सोमण सोबत सेल्फी काढण्यासाठी सर्वजण उत्सुक असतात. यावेळी मात्र मिलिंदसोबत सेल्फी काढण्यासाठी एका महिलेला पुशअप्स मारावे लागल्याने सध्या याची जोरदार चर्चा होत आहे.
आता एका महिलेने सेल्फी काढण्यासाठी मिलिंदची अट मान्य करत पुशअप्स मारले. सोशल मिडियावर व्हिडिओ पोस्ट करत म्हणाला की, रायपूरच्या एका छोट्या बाजारात मी होतो. तेथील चविष्ठ पदार्थांचा आस्वाद घेत होतो. तिथे एका महिलेने मला सेल्फीसाठी विचारलं. मी म्हटलं १० पुशअप मारावे लागतील. त्या महिलेने कोणाताही विचार न करता मी माझ्या मोबाइलचा कॅमेरा चालू करण्याआधीच १० पुशअप्स मारण्यास सुरुवात केली.
https://www.instagram.com/p/CPX_7zSncUs/?utm_source=ig_web_copy_link
पुढे तो म्हणाला, ‘ना साडीची चिंता, ना आजू-बाजूच्या लोकांची, कधीही पुशअप केले नाहीत याची तक्रार नाही. तिने कोणतेही कारण दिले नाही. कधी-कधी तुम्हाला आनंदी जीवनासाठी सक्षम होण्याची फार गरज असते. फक्त तुमच्याकडे हो मी हे करु शकतो बोलण्याची क्षमता लागते.’ सध्या मिलिंद सोमणने शेअर केलेला हा व्हिडीओ चर्चेत आहे. अनेकांनी या व्हिडीओवर कमेंट केल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- उस्मानाबादला मोठा दिलासा; तब्बल दीड महिन्यानंतर रुग्णांच्या संख्येत घट
- चंद्रपुरातील दारूबंदी हटविण्याचा निर्णय दुर्दैवी : देवेंद्र फडणवीस
- दिलासादायक! तब्बल ३ महिन्यांनी जालन्यात रुग्णसंख्या शंभरच्या आत
- ‘कोरोनामहामारीतही स्त्रियांवर अत्याचार सुरू आहेत, लोकांचे खुन होताहेत, तिथे दाखवा खाकीचा ज़ोर’
- राजकीय स्वार्थासाठी छत्रपतींवर दबाव टाकण्याचे पाप चंद्रकांत पाटलांनी करू नये – कॉंग्रेस


