Share

ICCच्या नियमावलीनं गोंधळला वासिम जाफर ; म्हणाला…

Published On: 

मुंबई : आयपीएल स्पर्धा रद्द झाल्यानंतर बीसीसीआयने भारतीय संघाची इंग्लंड दौऱ्यासाठी घोषणा केली. या दौऱ्यात पहिले भारतीय संघ जागतीक कसोटी चॅम्पियनशीप स्पर्धेचा अंतिम सामना खेळेल. १८ ते २२ जुनदरम्यान साउथहॅप्मटन येथे भारत आणि न्युझीलंड संघादरम्यान ही लढत होईल. मुंबईमध्ये दहा दिवसांचा कॉरंटाईन कालावधी पूर्ण करून भारतीय संघ २ जूनला इंग्लंडला रवाना होणार आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद अर्थात आयसीसीने या सामन्यासाठी नियम आणि अटींची आज घोषणा केली आहे. त्यानुसार ही कसोटी जर अनिर्णीत राहिली किंवा ‘टाय’ झाली तर दोन्ही संघांना संयुक्त विजेते म्हणून घोषित करण्यात येईल.

आयसीसीने या कसोटीसाठी राखीव दिवसाचाही घोषणा केली आहे. या सामन्यासाठी 23 जून हा राखीव दिवस ठेवण्यात आला आहे. पहिल्या पाच दिवसांत कोणत्याही कारणांनी खेळ वाया गेल्यास तो राखीव दिवशी खेळवण्यात येईल.

या अटींवर आणि नियमांवर प्रतिक्रिया येत आहे. भारताचा माजी सलामीवीर वासिम जाफरनं देखील यावर प्रतिक्रिया दिली आहे. जाफर गोंधळात पडला आहे आणि त्यानं मजेशीर मीम्स पोस्ट केला आहे.

आयसीसीनं हे दोन्ही निर्णय जून २०१८मध्येच जेव्हा आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची घोषणा केली तेव्हा घेतले होते. पाच दिवसानंतरही निकाल न लागल्यास राखीव दिवशी खेळ होणार नाही आणि सामना अनिर्णित जाहीर केला जाईल.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!