🕒 1 min read
कोल्हापूर- पावसाळा सुरू झाला तरी खरीप हंगामासाठीचे शेतकऱ्यांचे कर्जवाटप ठप्प आहे. शिवसेना – काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाविकास आघाडी सरकारने पुढाकार घेऊन ताबडतोब पीककर्जाचे वाटप सुरू करावे तसेच कर्जमाफी योजनेची अंमलबजावणी पूर्ण करावी या मागणीसाठी भारतीय जनता पार्टी सोमवारपासून राज्यात ठिकठिकाणी “कर्जमाफी करा, पीक कर्ज द्या,” आंदोलन सुरु केले आहे.
दरम्यान, दोन लाखापर्यंत कर्ज असलेल्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची पूर्ण यादी आलीच नाही आणि जी यादी आली त्यातील लाखो शेतकरी अजून वंचितअसल्याचे राज्यात चित्र आहे. महाविकास आघाडी सरकारने २२ मे रोजी आदेश काढला व शासनाजवळ निधी नसल्याने शेतकऱ्यांच्या खात्यात शासन रक्कम भरू शकत नाही, याची कबुली देवून ‘शासनाच्या नावे कर्ज मांडावे,’ असे बँकांना सांगितले. बँकांनी या शासन निर्णयाला केराची टोपली दाखवली असल्याचे समोर येत आहे. दोन लाखाच्या वर कर्ज असणाऱ्यांसाठी ओटीएसचा आणि नियमित कर्ज भरणाऱ्याच्या प्रोत्साहन अनुदानाचा आदेश देखील निघाला नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.
दरम्यान, कोल्हापुरात भाजपच्या वतीने कार्यालयासमारे मुक निदर्शेने करण्यात आली. शेतकऱ्यांना दिलेल्या कर्जमाफीचा आदेश नाही. शेतकऱ्यांना कर्ज वाटप केले जात नाही. त्यामुळे राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार महाभकास सरकार ठरले आहे, अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापुरात केली.
शेतकऱ्यांना वेळेत पिककर्ज मिळावे, बनावट बियाणे विक्री करणाऱ्यांवर कारवाई करावी, शेतकऱ्यांना जाहीर झालेली कर्जमाफीची रक्कम तत्काळ मिळून त्यांना कर्जमुक्त करावे, या मागणीसाठी भाजपने जिल्हाधिकारी दौलत देसाई यांना निवेदन देखील देण्यात आले.
भाजपमध्ये गेल्याचा किंचितही पश्चात्ताप नाही- विखे पाटील
महाविकास आघाडीत धुसफूस, नाराज कॉंग्रेस नेते घेणार थेट उद्धव ठाकरेंची भेट
हे वर्ष ‘या’ मंडळींसाठी सर्वात धोकादायक ठरण्याची मोठी शक्यता
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

