Share

हे वर्ष ‘या’ मंडळींसाठी सर्वात धोकादायक ठरण्याची मोठी शक्यता

Published On: 

तुळजापूर : तिर्थक्षेञ तुळजापूर येथे कोरोनाच्या संचारबंदी पार्श्वभूमीवर गेली दहा दिवसापासुन भाविक येणे ठप्प झाल्याने अर्थिक उलाढाल पूर्ण थांबल्याने उन्हाळा हंगाम फेल जाण्याची भिती व्यापारी आणि पुजारी वर्गातुन व्यक्त केली जात आहे.

तिर्थक्षेञ तुळजापूरला दर्शनासाठी येणारा भाविक येथे आला की पुजेचे प्रसादाचे साहित्य,देवीचे फोटो,पितळी मुर्त्या,कवड्याच्या माळा,परडी खरेदी व्यापारी वर्गाकडून करतो. उन्हाळ्याच्या अडीच महिन्यात चांगला व्यापार होवुन यातुन तो वर्षभराचा व्यवासायासाठी भांडवल उभा करतो. व्यापारी उन्हाळा हंगामासाठी बँका पतसंस्था कडून कर्ज काढुन रोज होणाऱ्या धंद्यातुन पिग्मी भरुन कर्जफेडी करुन काही रक्कम बचत करतो माञ कोरोना पार्श्वभूमीवर संचार बंदी लागु केल्यामुळे दुकानेच बंद असल्याने याआर्थिक व्यवहार व्यवसाय ठप्प झाला आहे.

दरम्यान, बँका पतसंस्था बचत गट मायक्रो फायन्यासचे कर्ज हप्ते कुठुन भरायाचे असे प्रश्न निर्माण झाल्याने यांचे हप्ते भरणे बंद आहे.त्यातच रिझर्व्ह बँकेनै तीन महिने हप्ते वसुली न करण्याचा सुचना केल्याने काही अंशी या किरकोळ व्यापाऱ्यांना दिलासा मिळाला असला तरीही ठोक व्यापाऱ्याकडून घेतलेल्या मालाचे पैसे फेडणे कठीण बनल्याने ठोक व्यापारी वार्गाची वसुली बंद आहे.

कोरोना मुळे व्यापार साखळी तुटली आहे.कोरोना मुळे रोज होणारी कोट्यावधी रुपयाचीउलाढाल थांबल्याने छोटेमोटे व्यापारी बँका पतसंस्था मायक्रो फायनान्स धोक्यात येण्याची शक्यता आहे. पिग्मी गोळे करणारे पिग्मी एंजट बँकातील नोकरदार यांच्या रोजीरोटी चा प्रश्न उभारण्याची शक्यता निर्माण झाली आहे.कोरोनाचा फटक्यातुन बाहेर येण्यास किती महिने लागणार हे आज कुणीही सांगु शकत नसल्याने 2020साल आजपर्यत इतिहासातील सर्वत धोकादायक साल या मंडळीना ठरणार आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!