मुंबई- राज्यातल्या महाविकास आघाडी सरकारमध्ये निर्णय प्रक्रियेत सहभागी केलं जात नसल्यामुळे काँग्रेस नाराज आहे. यामुळे आता काँग्रेस नेते मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेणार आहेत. शुक्रवारी रात्री काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी मुख्यमंत्र्यांशी फोनवरून चर्चा केली. यावेळी काँग्रेसच्या नाराजीच्या कारणांबाबत सोमवारी चर्चा करण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी थोरात यांना दिलं आहे. त्यामुळे सोमवारी बाळासाहेब थोरात आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत.
याबाबत माहिती देताना थोरात म्हणाले, तीन भावंडांमध्ये मतभेद असतात, आमचं तर तीन पक्षाचं सरकार आहे, असं सूचक विधानमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केलं आहे. सोमवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असल्याचंही थोरातांनी सांगितलं आहे. सत्तेत सहभागी असूनही काँग्रेसला विचारात घेतले जात नसल्याने पक्षाचे नेते नाराज आहेत.
“मी आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण मुख्यमंत्र्यांना भेटणार आहोत. सोमवारी आम्ही उद्धव ठाकरे यांची भेट घेऊ. पक्षांमध्ये मतभेद असतात आणि प्रत्येकाला तसा अधिकारही आहे. मात्र मुख्यमंत्र्यांशी बोलून या सर्व गोष्टी आम्ही सोडवणार आहोत” असे थोरात यांनी सांगत सारवासारव केली आहे.
दरम्यान, केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी एक अजब सल्ला कॉंग्रेसला दिला आहे. राज्य सरकारमध्ये महत्त्वाचे निर्णय घेताना काँग्रेसला विचारात घेतले जात नाही त्यामुळे काँग्रेसने राज्य सरकारचा पाठिंबा काढून घ्यावा असा सल्ला आठवले यांनी दिला आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री काँग्रेसला ग्राह्य धरत निर्णय घेत असल्याची खदखद काँग्रेस नेत्यांच्या मनात आहेत. याच पार्श्वभूमीवर केंद्रिय मंत्री रामदास आठवले यांनी काँग्रेसला हा सल्ला दिला आहे.
गर्दी केल्यास पुन्हा लॉकडाऊन कराव लागेल – उद्धव ठाकरे
‘मुख्यमंत्र्यांनी राजकारण करु नये ‘हा’ सल्ला पहिल्यांदा सामना संपादकांना द्यावा’
कर्जमाफीची यादी जाहीर केल्यानंतर महाविकास आघाडी सरकारने आमदारांना दिल्या सूचना
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

