Share

महाविकास आघाडी सरकारने मराठा समाजाच्या आरक्षणावर घाला घातला- बाळासाहेब मुरकुटे

Published On: 

अहमदनगर/ऋषिकेश घोगरे:- सरकारने मराठा समाजाच्या आरक्षणावर घाला घातला आहे. परीक्षा व भरतीच्या तोंडावर अचानक आरक्षणाला स्थगिती मिळाल्याने मराठा तरुण संतप्त झाला आहे. सरकारने त्वरित याप्रश्नी जबाबदारीने लक्ष घालावे, अन्यथा आता मराठा समाज शांत बसणार नाही असा इशारा माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी दिला आहे. आ.मुरकुटे यांच्या उपस्थितीत मराठा समाजाच्या आरक्षण प्रश्नी नेवासे शहरातील खोलेश्वर मंदिरासमोर मराठा कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. यावेळी तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांना निवेदन देण्यात आले.

मराठा समाजाला मिळालेले आरक्षण कायमस्वरूपी टिकावे म्हणून ज्या गांभीर्याने महाविकास आघाडी सरकारने निर्णय करायला हवे होते परंतु ते न झाल्यानेच न्यायालयात सक्षमपणे बाजू मांडण्यात सरकार कमी पडले. तसेच फडणवीस सरकारने दिलेले मराठा आरक्षण सुप्रीम कोर्टात टिकले तर त्याचे श्रेय फडणवीस सरकारला जाईल, म्हणूनच जाणीवपूर्वक आरक्षणावर बाजू मांडण्यासाठी महाविकास आघाडी सरकार कमी पडले, असे मुरकुटे म्हणाले.

यावेळी तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांना आंदोलनकर्त्यांनी निवेदन दिले. यावेळी मनोज पारखे, सतीश गायके, सचिन भांड, सचिन नागपुरे, अंकुश काळे, शिवाजी मोरे, उमेश ठाणगे, विकी परदेशी, राजेश उपाध्ये, अमोल कोकणे, गणेश दुधे, प्रताप चिंधे आदी उपस्थित होते.

महत्वाच्या बातम्या:-

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!