Share

आ.लंके यांनी तालुक्यासाठी केलेले कुठलेही एक समाजउपयोगी काम दाखवा- सुजित झावरे

Published On: 

अहमदनगर/ऋषिकेश घोगरे:- आमदार निलेश लंके यांनी पोलीस ठाणे व तहसील कार्यालय सोडून तालुक्यातील जनतेसाठी एखादे तरी समाजउपयोगी काम केले असेल तर त्यांनी ते दाखवावे. गेल्या वर्षभरात लोकप्रतिनिधींनी तालुक्यात कुठलीही विकासकामे केलेली नाहीत, अशी टीका जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजीत झावरे पाटील यांनी आमदार निलेश लंके यांच्यावर केली आहे. पारनेर तालुक्यातील पळसपूर येथे सुजित झावरे यांच्या माध्यमातून जिल्हा परिषदेतून निधी उपलब्ध होऊन बंधारा बांधण्यात आला. त्यातील पाण्याचे जलपूजन झावरे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी झावरे म्हणाले, पारनेर तालुक्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने उभी पिके जमिनदोस्त झाली आहेत. सरकारने नुकसान झालेल्या पिकांचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी. तसेच तालुक्याचे आमदार निलेश लंके राज्यात आपली फार वट असल्याचे सांगतात. मात्र, तालुक्याची अवस्था काय झाली आहे हे सर्वांना माहिती आहे. राज्याला दिशा द्यायचे सोडा, आधी तालुक्याचे बघा, अशी कोपरखळी सुजित झावरे यांनी आ.लंके यांना मारली आहे.

आ.निलेश लंके यांनी जे कोविड सेंटर उभारले आहे त्या कोविड सेंटरसाठी शासन सर्व पुरवत आहे. मग स्वतःच्या नावाचा गौरव कशासाठी करायचा? गळ्यात हात टाकणे, वाढदिवस साजरे करणे हे फार काळ टिकत नसतं. आ.लंके यांनी जनतेला वेड्यात काढून दिशाभूल करण्याचे काम केले आहे, असे झावरे म्हणाले.

महत्वाच्या बातम्या:-

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!