मुंबई:- दि. ११ : विस्तारित मुंबई शहराच्या मध्यभागी असलेल्या आरे जंगलाला आज पर्यावरण व पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी भेट दिली. आरे येथील जी ६०० एकर जागा जंगल म्हणून घोषित केली आहे. त्या जागेतील युनिट ४, २१ व २२ ला त्यांनी भेट दिली. यावेळी पर्यावरण विभागाच्या प्रधान सचिव मनिषा म्हैसकर, वन विभागाचे प्रधान सचिव मिलींद म्हैसकर, अतिरिक्त प्रधान मुख्य वन संरक्षक (वन्यजीव) सुनील लिमये, दुग्धविकास आयुक्त श्री. भांगे आदी उपस्थित होते.
त्याचप्रमाणे मंत्री श्री. ठाकरे यांनी आज वस्त्रोद्योग मंत्री अस्लम शेख, पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे (एमटीडीसी) व्यवस्थापकीय संचालक आशुतोष सलील व इतर अधिकारी यांच्या समवेत मालाड (वेस्ट) मधील एरंगळ येथील एमटीडीसीच्या जागेची पाहणी केली. मुंबईकर आणि पर्यटकांना याठिकाणी लवकरच पर्यावरणपूरक पर्यटनाचा आनंद घेता येणार आहे, असे मंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितले.
मागच्या फडणवीस सरकारने मेट्रो कारशेड बनवन्यासाठी अचानक रात्री आरे हजारो झाडे तोडली होती या घटनेनंतर महाराष्ट्रातील अनेक पर्यावरणप्रेमीनी आंदोलन केले होते. त्यावेळेला झाडे तोडण्याचा मोठा विरोध झाला म्हणून फडणवीस सरकारने त्यावेळी जरा नरमाई दाखवली. भाजप बरोबर त्या वेळी सत्तेत असलेल्या शिवसेनेने अरे मध्ये कारशेड बनवू नये अशी सरकार विरोधी भूमिका घेतली होती आदित्य ठाकरेंनीही आम्ही सत्तेत आल्या नंतर अरेतल्या झाडांना हात लावणार नाही. आता सत्तेत प्रमुख वाट असलेली शिवसेना या प्रकरणी काय भूमिका घेते हे पाहणे महत्वाचे ठरेल.
महत्वाच्या बातम्या:-
- बिहारमध्ये जाऊन फडणवीसांच्या उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
- अहमदनगरमधील शिवसैनिकांना कंगनाचा निषेध पडला महागात, १९ शिवसैनिकांवर गुन्हा दाखल
- किसान रेल अमरावतीवरून सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू, केंद्रीयमंत्री नितीन गडकरींची घोषणा
- कोरोनमुक्त होऊन घरी परतल्यावर गोपीचंद पडळकरांचे जंगी स्वागत झाले
- दिल्लीत चमचे कधी तुटतं नसतात ; ते फक्त एका कपातून दुसऱ्या कपात जातात
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

