🕒 1 min read
गोवा: संतोष परब हल्लाप्रकरणी भाजप आमदार नितेश राणे (BJP MLA Nitesh Rane)यांना जामीन मिळाला आहे. मात्र काल (१० फेब्रुवारी) छातीत दुखत असल्याचे सांगून राणे हॉस्पिटलमध्ये न जाता थेट गोव्यात पंतप्रधान मोदींच्या ( Prime Minister Narendra Modi)सभेला पोहचले. त्यांना सभेत बघून सर्वांनाच आश्चर्य वाटले आहे. त्यानंतर नितेश राणे आणि विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यात बंद खोलीत चर्चा झाली. यानंतर राजकीय चर्चांना ऊत आले आहे.
गोवा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नितेश राणे (BJP MLA Nitesh Rane) आणि देवेंद्र फडणवीस (Leader of Opposition Devendra Fadnavis) यांच्यात चर्चा झाल्याचे म्हटले जात आहे. मात्र अचानक राणेंना गोव्यात बघून सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.
कारण छातीत दुखत असल्याचे सांगून नितेश राणे जिल्हा रुग्णालयात दाखल झाले होते. तसेच काल सकाळीच त्यांनी आजारपणावरून मुख्यमंत्री ठाकरेंवर निशाणा साधला होता. पण अचानक त्यांना मोदींच्या सभेला बघून आश्चर्य व्यक्त केला जात आहे. दरम्यान आता या ठिकाणी आल्यानंतर दोन चार दिवस आराम करणार असून त्याठिकाणी काही तपासण्या केल्यानंतर उर्वरित तपासण्या मुंबईत जाऊन करणार असल्याचे नितेश राणेंनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या:
- आश्चर्यम! छातीत दुखत असल्याचे सांगून हॉस्पिटल न जाता नितेश राणे थेट मोदींच्या सभेत
- “त्यांनी माझ्या वाट्याचे श्रेय घेतले”; अजिंक्य रहाणेचा खळबळजनक खुलासा
- लतादीदींच्या स्मारकावरील वादावर मंगेशकर कुटुंबाकडून पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
- “मास्कमुक्तीबाबत कॅबिनेटच्या बैठकीत चर्चा,पण…”; राजेश टोपेंनी दिली महत्वाची माहिती
- आदिती तटकरेंना पालकमंत्री पदावरून हटवा; शिवसेना आमदारांची मागणी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
