मुंबई: विराट कोहली बॉर्डर गावस्कर ट्रॉफीच्या सामन्यात घरी परतल्यानंतर अजिंक्य रहाणेने भारतीय संघाची धुरा सांभाळली होती. आणि तात्पुरता कर्णधार म्हणून त्याच्या नेतृत्वात भारताने बॉर्डर गावस्कर ट्रॉफीसुद्धा जिंकली होती. त्या काळी उपकर्णधार असलेलय अजिंक्य रहाणेला खराब कामगिरीमुळे नंतर उपकर्णधारपदावरूनही पायउतार व्हावे लागले. सोबतच संघात त्याची जागाही अनिश्चित झाली आहे. या सगळ्या घडामोडी होत असताना अजिंक्य रहाणेने एक धक्कादायक खुलासा केला आहे.
बोरीया मजुमदार सोबत मुलाखतीत बोलताना अजिंक्य रहाणेने सांगितले “मी तिथे काय केले ते मला माहीत आहे. मला कोणाला काहीही सांगायची गरज नाही. जाऊन श्रेय घेण्याचा माझा स्वभावच नाहीये. हो अशा काही गोष्टी होत्या ज्यांचे निर्णय मी मैदानावर किंवा ड्रेसिंग रूममध्ये घेतले होते, परंतु त्याचे श्रेय इतर कोणीतरी घेतले. माझ्यासाठी तेव्हा महत्त्वाचे होते की आम्ही मालिका जिंकली. तो एक ऐतिहासिक मालिका विजय होता. माझ्यातही तो क्षण खास ठरला. ”
अजिंक्य रहाणेने वक्तव्यात कोणाचेही नाव घेतले नाही परंतु त्याची टिप्पणी माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्यावर असल्याचे बोलले जात आहे. २०२०-२१ च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारताच्या चांगल्या कामगिरी मध्ये रहाणेने मोठे काम केले. तेव्हाचा नियमित कर्णधार विराट कोहली अॅडलेड येथे झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यानंतर भारतात परतला होता. पहिल्या कसोटी सामन्यातच भारतीय संघाचा अपमानास्पद पराभव झाला. तेव्हा अजिंक्य रहाणेने अत्यंत कठीण परिस्थितीत संघाची जबाबदारी सांभाळली होती. मात्र त्या मालिकेला बऱ्याच काळ उलटल्यानंतर अजिंक्यने पहिल्यांदाच या बाबतीत वक्त्यव्य केले आहे.
महत्वाच्या बातम्या
- “मास्कमुक्तीबाबत कॅबिनेटच्या बैठकीत चर्चा,पण…”; राजेश टोपेंनी दिली महत्वाची माहिती
- आदिती तटकरेंना पालकमंत्री पदावरून हटवा; शिवसेना आमदारांची मागणी
- भाजपच्या माजी खासदाराला अश्लील व्हिडिओ दाखवून फसवले, लुटले हजारो रुपये
- ‘भाजप सरकारने गोव्यासाठी काय केले?’ ; तृणमूलचा प्रधानमंत्र्यांना सवाल
- औरंगाबादात काँग्रेसला धक्का, नेत्यांसह कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

