पुणे : काही दिवसांपूर्वी पुणे महापालिकेमध्ये (PMC) जात असताना भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्यावर शिवसैनिकांनी (Shivsainik) धक्काबुक्की केली. किरीट सोमय्या यांना धक्काबुक्की होत असताना ते पायऱ्यांवरून घसरून पडले. तद्पश्चात राजकीय वर्तुळात या प्रकरणावरून चांगलाच वाद पेटलेला दिसून येत आहे. तसेच यावरून राजकीय नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांचे सामने रंगत आहे. असे असतांनाच आज(११ फेब्रु.)पुन्हा एकदा किरीट सोमय्या हे पुणे (Pune) दौऱ्यावर असणार आहेत. त्यामुळे आज पुण्यात काय चित्र बघायला मिळेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
किरीट सोमय्या यांनी ट्विट करत आजच्या पुणे दौऱ्यासंदर्भात माहिती दिली असून सकाळी ९.४० वाजता ते पुणे दौऱ्यासाठी दिल्लीमधून निघतील. ११ वाजून ३० मिनीटांनी ते पुण्यात पोहचणार आहेत.
My tomorrow program at Pune
माझे उद्याचे पुणे येथील कार्यक्रम pic.twitter.com/MlUjdpipiK
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) February 10, 2022
दरम्यान, पुण्यात घडलेल्या घटनेनंतर किरीट सोमय्या यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली होती. तद्पश्चात पत्रकारांशी संवाद साधत असतांना ते म्हणाले होते की,‘पुण्यातील घटनेसंदर्भात राज्यपालांनी चिंता व्यक्त केली. ते याप्रकरणी राज्य सरकारकडे रिपोर्ट मागवणार आहेत. ते गृहमंत्र्यांशी देखील बोलणार आहेत.’ तसेच हल्ला करणारे एकूण ६४ जण असून या ६४ जणांना अटक करावी, असेही सोमय्या म्हणाले.
महत्वाच्या बातम्या:
- लतादीदींच्या स्मारकावरील वादावर मंगेशकर कुटुंबाकडून पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
- “त्यांनी माझ्या वाट्याचे श्रेय घेतले”; अजिंक्य रहाणेचा खळबळजनक खुलासा
- आश्चर्यम! छातीत दुखत असल्याचे सांगून हॉस्पिटल न जाता नितेश राणे थेट मोदींच्या सभेत
- हिजाब वादावर कर्नाटक उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
- सावधान! कोरोना नंतर आला नवीन आजार, केरळमध्ये सापडला पहिला रुग्ण


