Share

रेणापूरच्या कोविड सेंटर मधील रुग्णांचे जीव धोक्यात; यंत्रसामुग्री अभावी गेला एकाचा जीव

Published On: 

लातूर: रेणापूर येथील ग्रामीण रुग्णालयात सुरु करण्यात आलेल्या कोविड केअर सेंटरमध्ये भारती झालेल्या रुग्णांचा जीव धोक्यात असल्याचे बघायला मिळत आहे. या सेंटरमध्ये उपलब्ध असलेल्या सुविधा हाताळण्यासाठी कोणी नसल्याने उपचार घेत असलेल्या एका रुग्णाला आपला जीव गमवावा लागला आहे. तसेच इथे पुरेशा सुविधा देखील उपलब्ध नसल्याने रुग्णांचे हाल होत आहेत तसेच त्यांचा जीव देखील धोक्यात असल्याचे दिसत आहे.

येथील कोविड केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या एका रुग्णाचा मृत्यू झाला तर दोन रुग्णांची परिस्थितीसुध्दा गंभीर आहे. तेंव्हा येथील रुग्णालयात सुविधा उपलब्ध करावत अशी मागणी येथील नागरिकांतून केली जात आहे. या डेडीकेटेड कोविड हेल्थ केअर सेंटरमध्ये एकूण २० बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र येथील नियोजन व अपुऱ्या वैद्यकीय यंत्रसामुग्रीमुळे तसेच कमी कर्मचाऱ्यांमुळे रुग्णांचा जीव धोक्यात आला आहे. तसेच वेळेवर सुविधा मिळत नसल्याने येथील वृद्ध रुग्णांची मोठी गैरसोय होत आहे.

पालकमंत्री अमित देशमुख व आ. धिरज देशमुख यांनी ग्रामीण रुग्णालयास भेट देऊन येथील आरोग्य व्यवस्थेचा आढावा घेतला, शिवाय रुग्णांना मिळणाऱ्या सुविधा व उपाय योजनांबाबत प्रशासनास सूचना दिल्या. मात्र ग्रामीण रुग्णालयात केवळ नियोजन नसल्यामुळे तपासणीसाठी आलेल्या सर्वांना तासन्तास थांबावे लागत आहे. तपासणीत पॉझिटिव्ह रुग्णही आढळून येत आहेत. त्यामुळे तपासणीसाठी व लसीकरणासाठी येत असलेल्या नागरिकांत भितीचे निर्माण होत आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!