उस्मानाबाद: जिल्ह्यात कोरोनाचा प्रादूर्भाव झपाट्याने वाढत असल्याने रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण पडत आहे. कोरोना बाधितांसाठी ‘संजीवनी’ ठरणाऱ्या रेमडेसिव्हिरचा सर्वत्र तुटवडा पडला आहे. तर गंभीर रूग्णांना ऑक्सिजन बेडही वेळेवर मिळत नसल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. त्यामुळे नातेवाईकांची रेमडेसिवीरसह ऑक्सिजन बेड मिळविण्यासाठी मोठी धावपळ होत आहे.
शासकीय, खासगी रुग्णालयाच्या कोरोना कक्षात कोरोग्रस्त रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे.यामुळे ऑक्सीजन बेड, व्हेंटीलेटरसह अन्य सोयी-सुविधांही तोकड्या ठरत आहेत. कोरोनाच्या गंभीर रुग्णासाठी आवश्यक असणारे रेमडेसिव्हिर इंजेक्शन मिळणेही मुश्किल झाले आहे.जिल्ह्यातील गंभीर रुग्णांना जिल्हा रुग्णालयात रेफर करण्यात येत आहे. त्यामुळे जिल्हा रुग्णालयातही आणीबाणीची स्थिती निर्माण झाली असून सोयी-सुविधाही तोकड्या ठरत आहेत. जिल्हा रुग्णालयात कोरोनाग्रस्तांसाठी ३५२ ऑक्सीजन बेड व्यवस्था आहे.
परंतु गुरूवारी दुपारी एकही ऑक्सीजन बेड व व्हेंटीलेटर उपलब्ध नसल्याचे रूग्णाच्या नातेवाईकांनी सांगितले. रेमडेसिव्हरची मागणी दीडशे ते दोनशेच्या घरात असताना केवळ ३५ ते ४० व्हाईल्स उपलब्ध होत असल्याचे समजते. उस्मानाबाद शहरातील बहुतांश खाजगी रुग्णालयातही ऑक्सीजन बेड, व्हेंटीलेटर बेड शिल्लक नसल्याचा प्रकारही चव्हाट्यावर आला आहे. रेमडेसिव्हिर इंजेक्शनसाठी ठिकठिकाणची औषध दुकाने फिरूनही हे इंजेक्शन मिळत नसल्याने रुग्णांच्या नातेवाईकांचीही मोठी फरफट झाली.
महत्वाच्या बातम्या
- ‘भाजपा का बाबा बंगाली!’ राष्ट्रवादी काँग्रेसची पंतप्रधान मोदींवर खोचक टीका !
- चोराने कोरोना व्हॅक्सिन परत केली; जयंत पाटलांनी काळा बाजार करणाऱ्यांना झापलं !
- मदतीचा हात ! पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत दोन महिने मोफत धान्य मिळणार
- राज्यात सतराशे साठ लोक वेगवेगळं बोलताहेत, ज्याने नुसता गोंधळ झालाय; ‘ई-पास’वरून चित्रा वाघ संतापल्या
- फरार बाबा नित्यानंदच्या ‘मालकी’च्या ‘कैलाश देशा’त पर्यटकांना येण्यास मनाई
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

