Share

संचारबंदीनंतर लस न घेता फिरल्यास पाचशे रुपयांचा दंड!

Published On: 

औरंगाबाद : लॉकडाऊन संपताच रस्त्यावर फिरणार्‍यांना लस घेतल्याचे प्रमाणपत्र दाखवावे लागेल, नसता ५०० रूपये दंड आकारला जाईल, असा सक्त इशारा मनपा आयुक्त आस्तिक कुमार पांडेय यांनी गुरुवारी (दि.२२) दिला. कोरोनाला रोखण्यासाठी लसीकरण हा एकमेव उपाय आहे. त्यामुळेच लसीकरणाला प्राधान्य देत ४५ वर्षांवरील नागरिकांसाठी जम्बो लसीकरण मोहीम राबवली जात आहे. ३० एप्रिलपर्यंत ४५ वर्षावरील सर्वांनी लस घ्यावी, असे आवाहन महापालिका प्रशासक तथा आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांनी केले. या कारवाईबद्दल गांभीर्याने विचार सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

शहरातील कोरोनाच्या परिस्थितीबाबत पालिका आयुक्त पांडेय यांनी गुरूवारी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, शहरातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असली तरी ग्रामीण भागातून आणि इतर जिल्हयातून उपचारासाठी दाखल होत असलेल्या रुग्णांसाठी त्यांचे नातेवाईक व्हेंटिलेटर, आयसीयू, ऑक्सीजन बेड मिळविण्यासाठी धावपळ करीत आहे. शहरात मार्च महिन्यात हजार ते बाराशे रुग्ण आढळून येत होते. आता मात्र सहाशे ते सातशे रुग्ण निघत आहे.

ही रुग्णसंख्या कमी होण्यामागे प्रमुख कारण हे लसीकरण आहे. गतवर्षी जास्तीत जास्त चाचण्या करण्यावर भर दिला होता. यावेळी लसीकरण हा पर्याय समोर आला आहे. त्यामुळे नागरिकांचे लसीकरण करण्यावर अधिक लक्ष केंद्रीत केले आहे. आतापर्यंत १ लाख ८८ हजार नागरिकांचे लसीकरण झाले आहे. जम्बो मोहिमेअंतर्गत १४९ केंद्रांकरवी लसीकरण केले जात आहे. ३० एप्रिलपर्यंत ४५ वर्षावरील नागरिकांचे जास्तीत जास्त लसीकरण करण्याचा प्रयत्न आहे.

या नागरिकांनी लसीकरण करुन घेतले नाहीतर लॉकडाऊन नंतर लस घेतल्याचे प्रमाणपत्र दाखवावे लागेल, नसता ५०० रूपये दंड आकारण्याचा विचार सुरू असल्याचे आयुक्त पांडेय यांनी स्पष्ट केले. शहराच्या १६ लाख लोकसंख्येच्या प्रमाणात सध्या केवळ दहा टक्के लसीकरण झाले आहे. ४५ वर्षावरील नागरिकांतून लसीकरणाला प्रतिसाद मिळत आहे. जूनपर्यंत ५ लाख लसीकरण करण्याचे टार्गेट पालिकेने ठरविले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!