🕒 1 min read
नवी दिल्ली : प्रसिद्ध मुस्लिम विद्वान मौलाना वहीदुद्दीन खान यांचे बुधवारी वयाच्या ९६ व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या निधनाने देशाने खऱ्या विद्वान व्यक्तीला गमवले असल्याची संवेदना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने व्यक्त केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही मौलाना यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केलाय. देश त्यांच्या आध्यात्मिक ज्ञानाबाबत त्यांना कायम लक्षात ठेवेल, असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे.
मौलाना वहीदुद्दीन खान यांना वर्ष २००० मध्ये पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. तर याच वर्षी त्यांना पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्याची घोषणा करण्यात आली होती. कोरोना संसर्ग झाल्यानंतर १२ एप्रिल रोजी त्यांना अपोलो हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले होते. त्यांनी कुरानचे इंग्रजी भाषेत भाषांतर केले होते.
पद्मविभूषण मौलाना वहीदुद्दीन खान के निधन से देश ने इस्लाम के एक सच्चे विद्वान को खोया है, जो हमेशा धर्म की उचित विवेचना द्वारा सद्भावना व समन्वय का संदेश देते रहे। राष्ट्रीय स्वयंसेवक संघ उनके निधन पर अपनी गहरी संवेदना प्रकट करता है।
– दत्तात्रेय होसबाले,
सरकार्यवाह,
रा.स्व.संघ pic.twitter.com/DA1jihhEsq— RSS (@RSSorg) April 23, 2021
उत्तर प्रदेशमध्ये जन्मलेल्या मौलाना वहीदुद्दीन यांनी अनेक पुस्तके लिहिली आहे. त्यांच्या निधनाबाबत शोक व्यक्त करतांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाहक दत्तात्रेय होसबाळे यांनी म्हटले की, ‘मौलाना वहीदुद्दीन खान यांनी धर्माचे योग्य विवेचन करुन सद्भावना आणि समन्वयाचा संदेश दिला आहे.’
महत्त्वाच्या बातम्या
- ‘भाजपा का बाबा बंगाली!’ राष्ट्रवादी काँग्रेसची पंतप्रधान मोदींवर खोचक टीका !
- चोराने कोरोना व्हॅक्सिन परत केली; जयंत पाटलांनी काळा बाजार करणाऱ्यांना झापलं !
- मदतीचा हात ! पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत दोन महिने मोफत धान्य मिळणार
- चंद्रकांत पाटील, तुम्ही पुण्याचे सेवक आहात की पुनावालाचे? पटोलेंचा सवाल
- फरार बाबा नित्यानंदच्या ‘मालकी’च्या ‘कैलाश देशा’त पर्यटकांना येण्यास मनाई
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
