Share

महाराष्ट्राच्या मदतीसाठी गडकरींचा पुन्हा पुढाकार; आंध्र प्रदेशकडून मिळणार ३०० व्हेंटीलेटर्स !

Published On: 

मुंबई : महाराष्ट्रासह देशभरात कोरोना रुग्णांचा आकडा झपाट्याने वाढत आहे. महाराष्ट्रात पुन्हा एकदा कोरोना रुग्णांचा उद्रेक झाला असून या लाटेत आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण निर्माण झाला आहे. रुग्णांना बेड्स मिळत नाहीयेत. राज्यात ऑक्सिजन, रेमडेसिविर इंजेक्शन आणि इतर आवश्यक औषधांचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे.

ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे गंभीर स्थिती निर्माण झाली असून अनेक रुग्णांना आपला प्राण गमवावा लागत आहे. राज्य सरकारने केंद्र सरकारला मदतीची साद घातली असून केंद्राने देखील मदतीचा हात दिला आहे. मात्र, महाराष्ट्राला अधिक ऑक्सिजनची गरज आहे. अशातच, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देखील ऑक्सिजन पुरवठ्यासाठी पुढाकार घेतला आहे. नितीन गडकरी यांच्या पुढाकाराने आता विशाखापट्टणम येथील आयआयएनएल प्राणवायू निर्मिती प्रकल्पातून ९७ मेट्रिक टन द्रव्य (लिक्विड) प्राणवायू महाराष्ट्राला मिळणार आहे.

आता ऑक्सिजनच्या अधिकच्या पुरवठ्याची सोय केल्यानंतर नितीन गडकरी यांनी गंभीर रुग्णांसाठी आवश्यक असलेल्या व्हेंटीलेटर्सची उपलब्धता करून दिली आहे. गडकरींनी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय एस जगन मोहन रेड्डी यांच्याशी व्हेंटीलेटर्सच्या मदतीबाबत विनंती केली. गडकरींच्या विनंतीला सकारात्मक प्रतिसाद देत रेड्डी यांनी तब्बल ३०० व्हेंटीलेटर्सच्या मदतीची घोषणा केली असून लवकरच हे व्हेंटीलेटर्स महाराष्ट्रात रुग्णांच्या सेवेत दाखल होतील.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!