जालना: जिल्ह्यात कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्ह्यात संपूर्ण संचारबंदी लागू आहे. असे असेल तरी नागरिक आपला जीव धोक्यात घालून घराबाहेर पडत आहेत. दुसरीकडे पोलीस दलातील कोवीड योध्दे आपला जीव धोक्यात घालून नागरिकांच्या सुरक्षेसाठी रात्रंदिवस रस्त्यावर उभे राहून कर्तव्य बजावत आहेत. कोवीड काळात जिल्हा पोलीस दलातील २०२ अधिकारी व कर्मचाऱ्यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे.
जिल्ह्यात कोरोना विषाणूचा शिरकाव झाल्यापासून पोलीस दलातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या हिमतीने सर्व परिस्थितीचा सामना करत आहेत. कोरोनाच्या पहिल्या लाटेत चार महिने लॉकडाऊन होता. या काळात जिल्ह्यातील सीमांवर पाहारा देण्यापासून शहरातील प्रत्येक चौकात बंदोबस्त ठेवणे, नागरिकांना घरीच थांबवण्याचा सल्ला देण्याचे काम सध्या प्रशासन व नागरिक करत आहेत.
नियम मोडणाऱ्यांवर वेळ प्रसंगी कठोर भूमिका घेऊन कारवाई करण्याची जबाबदारी पोलीस दलातील कोवीड योध्द्यांनी अत्यंत प्रमाणिकपणे निभावली आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतही संचारबंदीच्या अंमलबजावणीची मोठी जबाबदारी पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांवर आहे. पोलीस दलातील कर्मचारी आपल्या जीवाची पर्वा न करता रस्त्यावर उतरून बंदोबस्त करत आहेत. मात्र, नागरिकांचे विनाकारण रस्त्यावर येणे खाकीतील या विरांसाठी धोकादायक ठरत आहेत.
महत्वाच्या बातम्या
- मुंब्र्यातील रुग्णालयाबाहेर राष्ट्रवादीची किरीट सोमय्यांविरोधात घोषणाबाजी
- नांदेड जिल्ह्यातील ६६ गावे कोरोनामुक्त
- २५ चेंडुत ५३ धावांची झुंजार खेळी करणारा हेटमायर पराभवानंतर भावूक; फोटो व्हायरल
- ब्रेक द चेन! नांदेड जिल्ह्यात ३ लाख जणांनी घेतली कोरोना प्रतिबंधक लस
- अग्नितांडव थांबेना! ठाण्यातील प्राईम क्रिटीकेअर हॉस्पिटलला आग, ४ रुग्णांचा मृत्यू
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
