Share

२५ चेंडुत ५३ धावांची झुंजार खेळी करणारा हेटमायर पराभवानंतर भावूक; फोटो व्हायरल

Published On: 

🕒 1 min read

अहमदाबाद : आयपीएलमध्ये मंगळवारी झालेल्या सामन्यात बेंगळुरु रॉयल्स चॅलेंजर्स संघाने दिल्ली कॅपीटल्स संघाचा अवघ्या एका धावेने पराभव केला. आरसीबीने दिलेल्या १७२ धावांचा पाठलाग करताना दिल्लीच्या फलंदाजानी १७० धावांपर्यंत मजल मारली. आखेरच्या चेंडुवर षटकाराची गरज असताना रिषभ पंतने चौकार मारल्याने एका धावेने आरसीबीचा विजय झाला. या विजयानंतर आरसीबी संघ हा पुन्ह गुणतालीकेत पहिल्या स्थानी विराजमान झाला आहे. धडाकेबाज खेळीसाठी आरसीबीचा फलंदाज एबी डिव्हीलियर्सला सामनावीराच्या पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.

या सामन्यात आखेरच्या चेंडुवर सहा धावांची गरज होती. मोहम्मद सिराजने ऑफ साइडला लो फुलटॉस चेंडु टाकला मात्र रिषभ पंत चेडुंपर्यंत निट पोहचु न शकल्याने केवळ चौकार मारण्यात यशस्वी झाला. आणि दिल्लीचा एका धावेने पराभव झाला. यावेळी कर्णधार रिषभ पंत स्वत:वर चिडलेला होता. तर नॉन स्ट्रायकर एण्डवर शिम्रॉन हेटमायर खाली बसुन राहीला. हेटमायरच्या चेहऱ्यावर हताश भाव दिसत होते. हातातोडांशी आलेला विजयाचा घास हिरावला गेल्याने तो खुप नाराज झाला होता. यावेळी विराट कोहलीने त्याच्याजवळ जात त्याचे सांत्वन केले. तसेच त्याच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकली.

आरसीबी विरुद्धच्या सामन्यात दिल्लीच्या डावातील १३व्या षटकात जेव्हा स्टॉयनीस बाद झाला तेव्हा दिल्लीला विजयासाठी ४४ चेडुंत ८० धावांची गरज होती. त्यावेळी रिषभ पंत ३३ धावांवर खेळत होता. यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या हेटमायरने २५ चेंडुत ५३ धावांची वादळी खेळी केली. या खेळीत त्याने २ चौकार आणि ४ षटकार लगावले.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!