Share

औरंगाबादेत क्रुरतेची परिसीमा; दगडाने ठेचले डोके अन जाळले गुप्तांग..!

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद: औरंगाबाद शहरात गेल्या काही दिवसात होत असलेल्या खुनाच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. मात्र शुक्रवारी उघड झालेल्या खूनाच्या घटनेत धक्कादायक बाब समोर आली आहे. तरुणाच्या डोक्यात दगड घालून खून करण्यात आला मात्र इतकेच नव्हे तर चक्क या तरुणाचे गुप्तांगही जाळण्यात आले. त्याचप्रमाणे गुप्तांगासोबत मृत देखील मृतदेह देखील जाळण्याचा प्रयत्न झाला आहे. सिद्धार्थ भगवान साळवे (वय ३२ रा. सिद्धार्थनगर टीव्ही सेंटर) असे या तरुणाचे नाव आहे. शहरातील टीव्ही सेंटर येथील व्यापारी संकुलात हा खून घडला आहे.

औरंगाबाद शहरात गेल्या सहा दिवसात घडलेली ही दुसरी घटना आहे. पोलिसांनी मृतदेह घाटीत नेला असून या प्रकरणी सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. सिद्धार्थ साळवे हा विवाहित असून त्याला एक लहान मुलगा देखील आहे. आपल्या दारूच्या व्यसनापायी त्याचे नेहमीच पत्नीसोबत खटके उडायचे. अशी माहिती नातेवाइकांनी दिली.

सिद्धार्थ हा मूळचा जालना जिल्ह्यातील जाफराबाद येथील हिवरा गावचा रहिवासी असून त्याच्या मृत्यूची माहिती कुटुंबियांना देण्यात आली आहे. सिद्धार्थ रात्री सिडको परिसरातील एका खासगी रूग्णालयात काम करत असे तर दिवसा तो पेंटरचे काम करत असे. गेल्या काही दिवसात घडणाऱ्या घटनांवरून पोलिसांसमोर शांतता राखण्याचे मोठे आवाहन निर्माण झाले आहे. शहरात घडणाऱ्या या सततच्या खुणांच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांच्या कामगिरीवरही संशय व्यक्त केला जात आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!