Share

सामना गमावल्यानंतर इंग्लंडच्या कर्णधाराचं मन जिंकणार वक्तव्य

Published On: 

अहमदाबाद : पाच टी20 सामन्यांच्या मालिकेमध्ये 2-2 अशी बरोबरी असताना अखेर भारतीय संघाने पाचव्या आणि निर्णायक क्रिकेट सामन्यात बाजी मारली. दमदार फलंदाजी आणि गोलंदाजीच्या बळावर संघाला हे यश संपादन करण्यात आलं. इंग्लंड संघापुढं रोहित शर्माच्या वादळी ३४ चेंडू मधील ६४ धावांच्या जोरावर भारताने २० षटकांमध्ये २२५ धावांचं आव्हान ठेवले होते. हा धावांचा डोंगर उभा करण्यासाठी कर्णधार विराट कोहली याने ५२ चेंडूत नाबाद ८० धावांची आक्रमक खेळी केली. तर सुर्यकुमार यादव आणि हार्दिक पांड्या यांनी अनुक्रमे १७-१७ चेंडूंत ३२ आणि ३९ धावा चोपल्या. यासह भारताने ही 5 सामन्यांची मालिका 3-2 ने जिंकली.

सामन्यासह टी२० मालिकाही गमावल्यानंतर इंग्लंडचा कर्णधार ऑयन मॉर्गनने सामन्यानंतरच्या सादरीकरणात लाखो भारतीय चाहत्यांची मने जिंकणारे वक्तव्य केले. मॉर्गन म्हणाला की, ‘त्यांच्या घरच्या मैदानात बळकट अशा भारतीय संघाचा खेळण्याचा अनुभव खूपच प्रभावी होता. आज शानदार असा एक सामना पाहायला आणि खेळायला मिळाला. सामन्याच्या अत्यंत महत्त्वाच्या क्षणी भारतीय संघाने आमचा पराभव केला आहे. त्यामुळे ते या विजयाचे हक्कदार आहेत. तथापि, आम्ही या मालिकेत बरेच चांगले क्रिकेटदेखील खेळले.’

‘या मालिकेनंतर मागे वळून पाहताना अनेक सकारात्मक गोष्टी आमच्या लक्षात आल्या. पूर्वीच्या सामन्यांमध्ये बर्‍याचदा असे दिसून आले की, मधल्या फळीतील फलंदाजीमध्ये आम्ही अपेक्षेप्रमाणे कामगिरी करू शकलो नाही. त्यामुळे मालिकेतील हे क्षण आमच्यासाठी खूपच भारी ठरले,’ असे मॉर्गनने पुढे म्हटले.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!