बीड: जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदाच्या आठ जागांसाठी शनिवारी झालेल्या मतदान प्रक्रियेदम्यान गालबोट लागले आहे. परळीत भाजप व राष्ट्रवादीचे कार्यकर्ते समोरासमोर भिडले. यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, ५८.३२ टक्के मतदान झाले असून रविवारी मतमोजणीनंतर निकाल घोषित होईल.
जिल्हा बँकेच्या निवडणुकीत सेवा संस्था मतदारसंघातील ११ जागांवरील सर्वच उमेदवार अपात्र ठरयाने निर्माण झालेला ट्विस्ट अखेरपर्यंत कायम राहिला. निवडणूक प्रक्रियेवर बहिष्काराची घोषणा करत ऐनवेळी भाजपने माघारीची खेळी खेळली. राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसने मात्र जोरदार तयारी केली होती. गुरुवारी पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी बीडमध्ये समर्थकांशी संवाद साधून रणनीती आखली होती तर शुक्रवारी माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकत माघार घेणे पसंद केले होते.
दरम्यान, परळीतील औद्योगिक वसाहत या एकमेव केंद्रावर शनिवारी मतदान प्रक्रिया पार पडली. दुपारी ४ वाजेपर्यंत अंतिम मुदत होती. मात्र, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मुदत संपल्यानंतर काही मतदार आणल्याचा आरोप करत भाजपने विरोध केला. त्यावरुन दोन्ही गटांचे कार्यकर्ते एकमेकांशी भिडले. खुर्च्यांची फेकाफेक करुन अर्वाच्च शिवीगाळ करण्यात आली. त्यानंतर लगेचच माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी तेथे धाव घेत शांततेचे आवाहन केले. उशिरापर्यंत पोलिसांत नोंद नव्हती.
महत्वाच्या बातम्या
- आज दिल्लीत अजित पवार, जयंत पाटील यांची शरद पवारांसह तातडीची बैठक
- तुडुंब भरुन जाणाऱ्या बसमधून जायला कोणता रिपोर्ट?, जुई गडकरीचा सवाल
- विराट कोहलीचं टशन ; वाद घालण्यासाठी जोस बटलरच्या दिशेनं सुसाट : पहा व्हिडिओ
- ‘सत्तेपुढे शहाणपण चालत नाही’ संजय राउतांच सूचक विधान
- ‘पंतप्रधान मोदी ‘मन की बात’ मध्ये अनेक घटनांना भावनिक फोडणी देतात त्यांनी पाणी नाकारलेल्या मुलाच्या विषयासही स्पर्श करावा’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

