मुंबई : कलर्स मराठी वाहिनीवरील ‘सुंदरा मनामध्ये भरली’ ही लोकप्रिय मालिका आहे. या मालीकेला लोक भरभरून प्रेम देतात. मालिकेचा चाहतावर्ग देखील खूप मोठा आहे. . या मालिकेत अभिमन्यूची भूमिका अभिनेता समीर परांजपे साकारत आहे. नुकतंच अभिनेता समीर परांजपे याने आषाढी एकादशी निमित्ताने एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये त्याने एका गाण्याचा व्हिडीओ शेअर केला आहे. सध्या त्याने शेअर केलेली पोस्ट खूप चर्चेत आहे.
समीरने क्षेत्र विठ्ठल हे गाणं गातानाचा एक व्हिडीओ इंस्टाग्रामवरुन पोस्ट केला आणि कॅप्शन मध्ये लिहिले की, “तीर्थ विठ्ठल….खरं तर हे गाणं निभावणं अतिशय कठीण आहे. माझ्या सारख्याने वाटेला ही जाऊ नये या गाण्याच्या..पण विचार केला, तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल आहे तर मग स्वर विठ्ठल लय ही विठ्ठल श्रुती विठ्ठल अनुभूती ही विठ्ठल..! चूकभूल द्यावी घ्यावी..!”
https://www.instagram.com/p/Cf0NFIGJP4d/
समीर सोशल मीडियावर खूप सक्रिय असतो. त्याने पोस्ट केलेला हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. चाहत्यांसोबत कलाकार देखील यावर प्रतिक्रिया देत आहेत.
महत्वाच्या बातम्या :


