Share

नागालँड घटनेतील जखमी व्यक्तीने अमित शहांचा दावा फेटाळला, म्हणाला, ‘इशारा न देताच…’

Published On: 

🕒 1 min read

कोहीमा (नागालँड) : नागालँड मधील मोन जिल्ह्यात अतिरेक्यांच्या घुसखोरीची माहिती मिळाल्यानंतर लष्कराच्या २१ पॅरा कमांडो गटातील जवानांनी संशयित अतिरेकी समजून एका कामगारांच्या वाहनावर गोळीबार केला होता. हे कामगार कोळसा खाणीत काम करुन घरी परतत होते. यात एकूण आठ कामगार होते त्यापैकी सहा जणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर दोघे गंभीर झाले आहे. वाचलेल्या एका कामगाराने अमित शहांचा दावा फेटाळला असून वाहन थांबवण्याची कोणतीही सूचना जवानांनी केली नसल्याचे सांगितले आहे.

वाहनामध्ये अतिरेकी नाही, तर खाण कामगार असल्याचे जवानांच्या लक्षात येताच त्यांनी दोन्ही जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल केले. जवानांनी गैरसमजातून मजुरांवर गोळीबार केला, अशी माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेच्या दोन्ही सदनांत सोमवारी दिली होती.

आता हल्ल्यातून बचावलेल्या २३ वर्षीय शिवांगने अमित शहांनी केलेला दावा फेटाळला आहे. शिवांग म्हणाला, जवानांनी कोणताही इशारा न देता गोळीबार केला. आम्ही पळत नव्हतो. कोळसा खाणीत काम संपवल्यानंतर आम्ही पिक-अप ट्रकमधून घरी परतत होतो. त्याचवेळी अचानक आमच्यावर गोळीबार सुरु झाला. किती वेळ हा गोळीबार सुरु होता हे आठवत नाही, पण बराच वेळ हे सुरु होतं.

बॉम्बस्फोट झाल्यासारखे आवाज होत होते. त्यांना आम्ही स्पष्ट दिसत होतो अंधारही झालेला नव्हता, तरीही ते गोळीबार करत होते. यानंतर मला एका दुसऱ्या वाहनातून दवाखान्यात नेण्यात आलं. माझ्या भावासह अनेकांचा मृत्यू झाल्याचे मी बघीतले होते, असे शिवांगने सांगितले आहे. शिवांगच्या खांदा आणि छातीवर गोळी लागली आहे. त्याच्यावर आसाम मेडिकल कॉलेज रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!