मुंबई : अवघ्या क्रिकेट जगताचे लक्ष लागुन राहिलेल्या जागतीक कसोटी चॅम्पियनशीप स्पर्धेचा अंतिम सामना भारत आणि न्युझीलंड दरम्यान साउथहॅम्पटन येथे सुरु आहे. सामन्याच्या तिसऱ्या दिवशी न्युझीलंडने भारतीय संघाला पहिल्या डावात २१७ धावांवर रोखले. न्युझीलंडने त्याच्या पहिल्या डावात चांगली सुरुवात केली आहे. तिसऱ्या दिवसाअखेर न्युझीलंडची स्थिती १०१ वर २ बाद अशी होती.
या सामन्यात भारताची फलंदाजी सुरु असताना रोहित शर्मा बाद झाल्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर चेतेश्वर पुजारा फलंदाजीसाठी आला. पुजाराने पहिली धाव घेण्यासाठी तब्बल ३६ चेंडु खेळले होते. यानंतर एका श्रीलंकन क्रिकेट चाहत्याने पुजाराला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला. त्याने ट्विट करताना लिहीले आहे की, ‘पुजाराने ३६व्या चेंडुवर पहिली धाव घेत अॅडलेड येथील ३६ वर ऑलआउट झालेल्या डावाला अनोखी मानवंदना दिली आहे.’ अस खोचक ट्विट केले आहे.
Pujara got off the mark in the 36th delivery as a tribute to their 36 allout in the Adelaide Test inns. #Cricket
— Daniel Alexander (@daniel86cricket) June 19, 2021
या ट्विटनंतर भारतीय क्रिकेट रसिकांनी त्याची चांगलीच फिरकी घेत बोलती बंद केली. एका युजरने आगामी जुलै महिन्यातील भारतीय बी संघ तुम्हाला नमवण्यासाठी पाठवत आहोत. पण एक गोष्ट सांगा की आयसीसीच्या कसोटी क्रमवारीत श्रीलंका संघ कुठल्या स्थानी आहे. चेतेश्वर पुजाराने या सामन्यात ५४ चेंडुत ८ धावा करून पुजारा बाद झाला होता. पुजाराच्या अशा या खेळीमुळे तो अनेकदा ट्रोल होत असतो.
महत्वाच्या बातम्या
- भाजप-सेनेची युती ही हिंदुत्वावर होती, ती पुढेही होऊ शकते – गिरीश बापट
- अखेर ‘बिग बॉस मराठी ३’ लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला
- ‘आमच्याकडे अजून तो आजार आलेला नाही, शिवसेनेत फक्त बाळासाहेब ठाकरे हा एकमेव गट’
- डब्ल्युटीसी फायनल! यामुळे भारतीय फलंदाज अपयशी?
- ‘कसोटी चॅम्पियनशीप गेली खड्डयात पण….’ सोशल मीडीयावर विराटकडे केली ‘ही’ मागणी


