मुंबई : २ जुनपासुन इंग्लंड येथील लॉर्ड्स या मैदानावर इंग्लंड आणि न्युझीलंड या दोन्ही संघात पहिला कसोटी सामना सुरु झाला. सामन्याच्या पहिल्या दिवशी न्युझीलंडचे वर्चस्व राहिले. पहिल्या दिवसाआखेर न्युझीलंडच्या संघाने ८६ षटकात ३ गडी गमावत २४६ धावांची मजल मारली.
दरम्यान, भारतीय क्रिकेट टीम वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलसाठी लंडनला पोहोचली आहे. विराट कोहलीच्या टीमला इंग्लंडमधील पहिल्या दिवशीच खूशखबर मिळाली आहे. इंग्लंड मध्ये सध्या लॉर्ड्सवर इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात टेस्ट मॅच सुरू आहे. या टेस्टमध्ये केन विल्यमसनच्या टीमची मोठी कमकुवत बाजू उघड झाली आहे. याचा टीम इंडियाला फायनलमध्ये फायदा होऊ शकतो.
कॉनवेला हेन्री निकोलसनं 61 रन काढून चांगली साथ दिली. तर लोअर ऑर्डरचा बॅट्समन नील वेगनारने नाबाद 25 रन काढले. या दोघांशिवाय संघातील एकही बॅट्समन फार काळ टिकू शकला नाही. त्यांचा हा खेळ पाहून टीम इंडियाला फायनल मॅचमध्ये रणनीती तयार करणे सोपे होणार आहे.
महत्वाच्या बातम्या
- मिल्खा सिंग यांची तब्येत पुन्हा खालावली ; ICU मध्ये दाखल
- ‘गोपीचंद पडळकर भाजपचे बुजगावणं, त्यांच्याकडे महाविकासआघाडीच्या नेत्यांनी लक्ष देऊ नये’
- २०२४ मध्ये काँग्रेस स्वबळावर सत्तेत येईल असं काम करा; पटोलेंनी पुन्हा ठोकला ‘स्वबळाचा’ शड्डू
- शतक कॉनवेचे; चर्चा मात्र दादाची! जाणून घ्या काय आहे कारण..
- ‘मला घाई होती, त्यामुळे पत्रकार परिषदेत ‘तत्वतः’ मान्यता हा शब्द राहिला’; वडेट्टीवारांच अजब स्पष्टीकरण
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

