🕒 1 min read
ऑस्ट्रेलिया : भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान मेलबर्न इथं सुरू असलेल्या दुसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्यात भारतानं यजमान संघावर ८ गडी राखून विजय मिळवला.ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव २०० धावांवर गुंडाळल्यावर विजयासाठी भारतासमोर ७० धावांचं माफक आव्हान होतं. सुरुवातीला दोन धक्के बसल्यावर पहिल्या डावात शतक झळकावणाऱ्या कर्णधार अजिंक्य रहाणे यानं नवोदित शुभमन गिलच्या साथीनं हे लक्ष्य सहज पार केलं. या विजयायामुळं कसोटी मालिकेत भारतानं १-१ अशी बरोबरी साधली आहे.
दरम्यान, चाहत्यांच्या चेहऱ्यावर आलेलं हसू हेच आमच्यासाठी बक्षीस आहे असं भावनिक ट्विट कर्णधार अजिंक्य रहाणेने केलं आहे अजिंक्यने आपल्या या ट्विटमध्ये लिहिले आहे की, ‘ भारतातील ज्या व्यक्ती स्पोर्ट्स पाहतात त्यांच्या चेहऱ्यावर हास्य खुलावण्याची ताकद भारतीय संघात नक्कीच आहे आणि आम्ही हे करू शकलो, याचे समाधान आहे. तुम्ही जे आम्हाला प्रेम दिले, ज्यापद्धतीने पाठिंबा दिला, ते आमच्यासाठी फार मोलाचे आहे. तुमच्या प्रेमाची आणि पाठिंब्याची आम्हाला नक्कीच गरज आहे. आगामी दोन्ही कसोटी सामन्यांमध्ये आम्ही अथक मेहनत घेऊ…’
Thank you ???? pic.twitter.com/tJdduct5Pl
— Ajinkya Rahane (@ajinkyarahane88) December 30, 2020
दरम्यान, सात जानेवारीपासून तिसरा कसोटी सामना होणार आहे. त्यानंतर अखेरचा व चौथा कसोटी सामना हा ब्रिस्बेन येथे १५ जानेवारीपासून खेळवण्यात येणार आहे. गेल्या काही दिवसांपासून सिडनीमध्ये कोरोना रुग्ण वाढल्याचे दिसून येत आहे. व हिटमॅन रोहित शर्मा देखील काही दिवसांपासून सिडनीमधील एका हॉटेलमध्ये क्वारंटाइन आहे. व रोहित शर्मा 4 टेस्ट मॅच मध्ये खेळणार का नाही यावर प्रश्न उपस्थित होत होते. अखेर रोहित 4 टेस्ट मॅच मध्ये खेळणार असून क्रिकेट चाहते खुश आहेत. रोहितच्या येण्याने टीम इंडिया आणखीन मजबूत होईल.
महत्वाच्या बातम्या
- महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा महत्वाचा निर्णय; परीक्षा देण्यासाठीच्या नव्या मर्यादा केल्या जाहीर
- महेबूब शेख यांना नाहक बदनाम करण्याचे भाजपचे षडयंत्र – राष्ट्रवादी
- विरोधी पक्षाने फक्त तंबूत बसून निदर्शने करावीत; शेतकरी नेत्यांची टीका
- तृतीयपंथीयांच्या मनाचा मोठेपणा; साईबाबांच्या झोळीत टाकले 11 लाखांचे दान
- रेल्वे मंत्री पीयूष गोयल करणार रेल्वेची ‘नवी वेबसाइट’ लॉन्च
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
