मुंबई : आयएनएस विक्रांत निधी प्रकरणात कालच किरीट सोमय्या यांचा जामीन अर्ज फेटाळला गेला होता. याच प्रकरणात किरीट सोमय्या यांचे पुत्र नील सोमय्या हे देखील सहआरोपी आहेत. आज न्यायालयात निल सोमय्या यांच्या जामीन अर्जावर सुनवाई होती. याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. आता न्यायालयाने किरीट सोमय्या यांच्याप्रमाणेच नील सोमय्या यांचा देखील जमीन अर्ज फेटाळला आहे.
सोमय्या पिता पुत्रांनी आपल्याला उच्च न्यायालयाकडे जाईपर्यंत तरी अटकेपासून संरक्षण मिळावे, अशी मागणी न्यायालयाकडे केली होती. परंतु न्यायालयाने त्यांची ही मागणी देखील फेटाळली गेली आहे. यामुळे आता सोमय्या पितापुत्राच्या डोक्यावर अटकेच्या कारवाईची टांगती तलवार असणार आहे. यामुळे सोमय्या पितापुत्रांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे.
सोमय्या पितापुत्र हे दोन दिवसांपासून नॉट रिचेबल आहेत. ते गुजरात मध्ये असल्याची बातमी काल आली होती. पण सोमय्या हे महाराष्ट्रात का ना नाहीत ? असा सवाल विचारला जात होता. आता विरोधीपक्षनेते प्रवीण दरेकर यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.
“किरीट सोमय्या हे पळून जाण्याऱ्यातले नाही. ते पळपुटे नाहीत. सोमय्या हे पोलीस चौकशीला निश्चितपणे सामोरे जातील” असे प्रवीण दरेकर म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या :


