Share

शरद पवार नाराज ? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घेणार भेट

Published On: 

मुंबई: मनुसख हिरेन प्रकरणात विरोधकांच्या सभागृहातील गदारोळानंतर राज्य सरकारने सचिन वाझे यांना गुन्हे शाखेतून हटवण्याचा निर्णय घेतला आहे. हिरेन मनसुख हिरेन प्रकरणात गुन्हे शाखेचे अधिकारी सचिन वाझे यांच्यावर झालेल्या आरोपांमुळे आणि एकंदरच याप्रकरणाच्या हाताळणीवरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार नाराज असल्याचे समजत आहे. त्यासाठी शरद पवार बुधवारी संध्याकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भेट घेणार आहेत.

काहीवेळापूर्वीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यात फोनवरुन चर्चा झाल्याचे समजत आहे. त्यानंतर आता शरद पवार दिल्लीहून मुंबईला येण्यासाठी निघाले आहेत. मुंबईत आल्यानंतर संध्याकाळी शरद पवार मुख्यमंत्र्यांना भेटतील. या भेटीदरम्यान मनसुख हिरेन प्रकरण आणि त्यामधील सचिन वाझे यांचा कथित सहभाग या दोन गोष्टींवर चर्चा होण्याची दाट शक्यता आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, ठाकरे सरकारकडून हे संपूर्ण प्रकरण ज्या ढिसाळपणे हाताळले गेले आहे त्यामुळे शरद पवार प्रचंड व्यथित झाले आहेत. शिवसेनेशी संबंधित असलेल्या सचिन वाझे यांना राजकीय संरक्षण दिले जात असल्याचा आरोप केला जात आहे. शिवसेनेच्या आग्रहामुळेच सचिन वाझे यांना पोलीस दलाच्या सेवेत पुन्हा सामावून घेण्यात आले होते. मात्र, आता हिरेन मनसुख मृत्यूप्रकरणातील आरोपांमुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना सभागृहात विरोधकांच्या हल्ल्याला तोंड द्यावे लागत आहे. या सगळ्याचा फटका राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रतिमेला बसत आहे. अशा परिस्थितीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे एकदाही सभागृहात फिरकले नाहीत. या सगळ्यामुळे शरद पवार प्रचंड नाराज असल्याचे समजत आहे. त्यामुळे शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या आजच्या भेटीत काय घडणार, याकडे सर्व राज्याचं लक्ष लागल आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!