🕒 1 min read
मुंबई : ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर १२७ कोटीच्या घोटाळ्याचे आरोप केल्याच्या पार्श्वभूमीवर भाजपचे नेते किरीट सोमय्या हे आज मुंबईतून कोल्हापूरला जाण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे पोहोचले आहेत. ते महालक्ष्मी एक्सप्रेसने कोल्हापूरला जाणार आहेत. कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हाबंदीची नोटीस बजावली आहे. कायदा-सुव्यवस्थेचे कारण देत जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांनी सोमय्या यांना नोटीस बजावली आहे.
दरम्यान, आज सकाळपासूनच मुंबई पोलिसांनी सोमय्या यांच्या निवासस्थानाबाहेर मोठा फौजफाटा तैनात केला होता. ठाकरे सरकार बेकायदेशीररित्या अटक करण्याचा डाव आखत असल्याचा दावा सोमय्या यांनी केला होता. यावेळी त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. ‘गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी माझ्यासाठी एवढ्या पोलिसांची व्यवस्था करून स्थानबद्धता करण्यापेक्षा गायब माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना शोधण्यासाठी त्यांचा वापर करावा, असा खोचक सल्ला दिला.
यासोबतच, हसन मुश्रीफ आणि अन्य मंत्र्यांचे गंभीर घोटाळे समोर येऊ नयेत म्हणून मला दडपण्याचा प्रयत्न केला आहे. गृहमंत्र्यांनी शरद पवारांच्या सांगण्यावरून मला डांबून ठेवलं, असा आरोप देखील सोमय्या यांनी यावेळी केला.
महत्त्वाच्या बातम्या
- ही भूमी छत्रपती शिवरायांची आहे, मुघलांची नाही; सोमय्यांवरील कारवाईवरून भाजप आक्रमक
- पुणेकरांना बाप्पा पावला; गणेशोत्सवाच्या दहा दिवसांत कोरोनामध्ये वाढ नाही – मुरलीधर मोहोळ
- मोठी बातमी : प्रवीण दरेकर फडणवीसांच्या भेटीला, तर सोमय्या सीएसएमटीवर दाखल
- काँग्रेसचे धक्कातंत्र; चरणजीत सिंग चन्नी होणार पंजाबच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान
- ‘लगे रहो किरीटजी, इनकी बजाते रहो’; नितेश राणे यांचे खोचक ट्विट
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
