मुंबई : ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर १२७ कोटीच्या घोटाळ्याचे आरोप केल्याच्या पार्श्वभूमीवर भाजपचे नेते किरीट सोमय्या हे सोमवारी कोल्हापुरात जाणार आहेत. मात्र त्याआधीच त्यांना कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हाबंदीची नोटीस बजावली आहे. कायदा-सुव्यवस्थेचे कारण देत जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांनी सोमय्या यांना नोटीस बजावली आहे. तर, आज सकाळपासूनच मुंबई पोलिसांनी सोमय्या यांच्या निवासस्थानाबाहेर मोठा फौजफाटा तैनात केला आहे.
ठाकरे सरकार बेकायदेशीररित्या अटक करण्याचा डाव आखत असल्याचा दावा सोमय्या यांनी केला होता. तर कोल्हापूरमध्ये जाण्यावर सोमय्या हे ठाम असून महालक्ष्मी एक्स्प्रेसने कोल्हापूरमध्ये उद्या दाखल होणार असल्याची माहिती सोमय्या यांनी दिली आहे. दुसरीकडे, राष्ट्रवादीसह हसन मुश्रीफ यांच्या समर्थकांनी देखील सोमय्या यांना विरोध करण्यासाठी जय्यत तयारी केली असून मोठा संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे. दरम्यान, मुंबईत पोलिसांनी सोमय्या यांना केलेल्या स्थानबद्धतेचा भाजपने तीव्र निषेध केला आहे.
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी किरीट सोमय्या यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. यावेळी त्यांनी ठाकरे सरकारचा समाचार घेतला. तर, सोमय्या यांना कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हाबंदीची नोटीस बजावल्यामुळे वरिष्ठांशी चर्चा करून त्यांच्या दौऱ्याबाबत निर्णय घेऊ असं दरेकर यांनी सांगितलं होतं. त्याप्रमाणे तपशील देण्यासाठी दरेकर हे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या सागर या निवासस्थानी दाखल झाले आहेत. त्यामुळे या दोन नेत्यांमध्ये काय चर्चा होणार आणि सोमय्या काय निर्णय घेणार हे महत्वाचं ठरणार आहे.
सोमय्या सीएसएमटीवर दाखल
कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हाबंदीची नोटीस दिल्यानंतर देखील सोमय्या हे कोल्हापूरला जाण्यावर ठाम असल्याचं समोर येत आहे. कोल्हापूरला महालक्ष्मी एक्सप्रेसने जाण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे पोहोचले आहेत. पोलीस देखील तिथे दाखल झाले असून त्यांना रेल्वेमध्ये जाण्यापासून पोलिसांनी रोखलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ही भूमी छत्रपती शिवरायांची आहे, मुघलांची नाही; सोमय्यांवरील कारवाईवरून भाजप आक्रमक
- पुणेकरांना बाप्पा पावला; गणेशोत्सवाच्या दहा दिवसांत कोरोनामध्ये वाढ नाही – मुरलीधर मोहोळ
- अफगाणिस्तानमध्ये भारतीय गुंतवणूक सुरु राहणार?; गडकरींनी दिले उत्तर
- काँग्रेसचे धक्कातंत्र; चरणजीत सिंग चन्नी होणार पंजाबच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान
- ‘लगे रहो किरीटजी, इनकी बजाते रहो’; नितेश राणे यांचे खोचक ट्विट
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

