मुंबई : राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापलाय. मराठा समाज आक्रमक झाला असून भाजप खासदार संभाजीराजे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसह राज्य सरकारला ६ जून पर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे. त्यांनी ५ प्रमुख मागण्या केल्या असून त्या मान्य न झाल्यास शिवराज्याभिषेक दिनी रायगडावरून आंदोलनाची सुरुवात करू, असा इशारा दिला आहे.
मागील काही दिवसांमध्ये मराठा समाजाच्या मागण्यांसाठी संभाजीराजेंनी अनेक नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या असून ते पुढे कठोर पाऊल उचलण्याच्या तयारीत आहेत. मात्र, अशातच संभाजीराजे यांच्या एका ट्विटने खळबळ उडाली आहे. सरकार माझ्यावर पाळत ठेवतंय, असा आरोप संभाजीराजेंनी केला आहे. यावर गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
‘छत्रपती संभाजीराजेंवर पाळत ठेवण्याचा किंवा हेरगिरी करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. ते राज्यभर करत असलेल्या दौऱ्यांदरम्यान कोणतीही सामाजिक अपप्रवृत्ती त्यांच्या कार्यक्रमात विघ्न आणू नये म्हणून पुरेसा बंदोबस्त सिंधुदुर्ग दौऱ्यात नेमण्यात आला होता. यासंदर्भात माझी संभाजीराजेंशी चर्चा झालेली आहे आणि त्यांचा गैरसमज पूर्णपणे दूर झालेला आहे,’ असं गृहमंत्री म्हणाले. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून यावर स्पष्टीकरण दिलं आहे.
यासंदर्भात माझी संभाजी राजेंशी चर्चा झालेली आहे आणि त्यांचा गैरसमज पूर्णपणे दूर झालेला आहे.@YuvrajSambhaji
— Dilip Walse Patil (@Dwalsepatil) May 31, 2021
दरम्यान, मराठा समाजाचे आरक्षण व इतर प्रश्नांसंदर्भात राज्यसभेचे सदस्य छत्रपती संभाजीराजे यांनी गेल्या काही दिवसांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह राज्यातील अन्य महत्वाच्या नेत्यांची भेट घेतली होती. संभाजीराजे यांनी सरकारला तीन पर्याय सुचविले आहेत. तसेच आरक्षणाचा प्रश्न निकाली लागेपर्यंत समाजाच्या विकासासाठी पाच मागण्याही सरकारसमोर मांडल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या
- पेट्रोल नॉट-आऊट @शंभरी पार; पुणेरी शैलीत काँग्रेसची मोदी सरकारला चपराक !
- १५ दिवसात १ कोटी रुपये देत माफी मागा, अन्यथा फौजदारी गुन्हा ; निलेश लंके आक्रमक
- वर्दीतील दरोडेखोर लवकरच गजाआड जातील; हसन मुश्रीफ यांचा सूचक इशारा
- मोदींनी गेल्या सात वर्षात जनतेचा विश्वास गमावला ; शिवसेना खासदाराची टीका
- आंध्रप्रदेश सरकारचा मोठा निर्णय ; बहुचर्चित आनंदैयाच्या आयुर्वेदिक औषधांना दिली मंजुरी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

