Share

मोदींनी गेल्या सात वर्षात जनतेचा विश्वास गमावला ; शिवसेना खासदाराची टीका

Published On: 

मुंबई : केंद्रातील मोदी सरकारला आज सात वर्षे पूर्ण झाली आहेत, तर मोदींच्या दुसऱ्या कार्यकाळाला दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. मोदी सरकारच्या या सात वर्षाच्या कामगिरीचा आढावा घेताना काँग्रेस ने त्यावर सडकून टीका केल्याचे आपल्याला सकाळपासून पाहायला मिळाले परंतु आता शिवसेनेन देखील याच मुद्द्यावर भाजपवर सडकून टीका करायला सुरुवात केली आहे.

शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी भाजपवर टीका केली आहे. यावेळी ते म्हणाले कि, ‘या सात वर्षात आम्ही मोदींसोबत होतो. या सरकारने गेल्या सात वर्षात दोन निर्णय चांगले घेतले आणि चार निर्णय अतिशय वाईट घेतले, असं सांगतानाच मोदींनी गेल्या सात वर्षात जनतेचा विश्वास गमावला, अशी टीका अरविंद सावंत यांनी केली. मोदींनी केंद्रात सत्तेत येऊन सात वर्ष पूर्ण केले आहेत. आम्ही त्या सात वर्षात काही वर्ष त्यांच्यासोबत होतो. गेल्या 70 वर्षात काहीच चांगलं झालं नाही, असं आम्ही म्हणणार नाही. 70 वर्षातही चांगली कामे झाली असंच आम्ही म्हणू. कदाचित आम्ही दोन पाऊल पुढेही असू, असं सांगतानाच या सात वर्षात 370 कलम रद्द झालं आणि राम मंदिराचा प्रश्न मार्गी लागला हे दोन निर्णय चांगले झाले.

पण नोटाबंदी, जीएसटी, कामगार कायदा आणि कृषी कायदा हे चार निर्णय अतिशय वाईट होते. त्यामुळे सर्वसामान्य जनता होरपळून गेली आहे. नोटाबंदीमुळे बेरोजगारी वाढली आहे. कोरोनामुळे ती शिगेला पोहचली आहे, असं त्यांनी सांगितलं. तसेच ‘केंद्र सरकार महाराष्ट्राबाबत दुजाभावाने वागत आहे. महाराष्ट्रातील उद्योग धंदे पळवले जात आहेत. तौक्ते चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी मोदी गुजरातला गेले. विमान थोडं पुढं सरकवलं असतं तर कोकणची किनारपट्टी दिसली असती. हजार कोटी गुजरातला देणारे मोदी महाराष्ट्रबद्दल एक शब्दही बोलत नाहीत. मोदींनी आपला विश्वास गमावला आहे,’ अशी टीका त्यांनी केली.

दरम्यान, आज काँग्रेसने राज्यभरात ठिकठिकाणी निषेध नोंदवला आहे. तसेच पत्रकार परिषदा आणि कार्यक्रम घेऊन मोदी सरकारच्या कारभाराची पोलखोल केली आहे. नाशिक येथे काँग्रेसचे प्रमुख नेते आणि महसलू मंत्री बाळासाहेभ थोरात यांनी पत्रकार परिषद घेतली यावेळी त्यांनी मोदी सरकारवर भाजपवर टीका केली. भाजपनं सत्तेत येण्यासाठी दिलेली आश्वासनं, वाढती महागाई, कोरोना स्थितीवरुन थोरात यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!