पुणे : देशात गेल्या वर्षीपासून कोरोना महामारीने हाहाकार माजवला आहे. या रोगाच्या संसर्गाला आळा घालण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे देशाची आर्थिक स्थिती बिकट झाली. लाखो लोकांना आपला रोजगार गमवावा लागला. यामुळे शेतकऱ्यांपासून ते सर्वच स्तरातील नागरिक हे आर्थिक विवंचनेत सापडले आहेत.
अशातच, सामान्यांच्या खिशावरील आर्थिक ताण वाढत असून तेलापासून ते पेट्रोल-डिझेलपर्यंत मोठ्या प्रमाणात भाववाढ केली जात आहे. मागील काही महिन्यांपर्यंत शंभरीच्या दारात गेलेल्या पेट्रोलच्या किंमती देशातील पश्चिम बंगाल, केरळसह ५ राज्यांच्या निवडणुकांच्या काळात काहीशा कमी झाल्याचं दिसून आलं. मात्र, आता पुन्हा एकदा पेट्रोलमध्ये दररोज वाढ होत आहे.

राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पेट्रोलने शंभरी पार केली असून पुण्यात देखील पेट्रोलची शंभरी पार केली आहे. पुण्यात ३१ मे रोजी १००.१५ इतक्या दाराची नोंद करण्यात आली. यामुळे, पुणे काँग्रेसने खास ‘पुणेरी’ शैलीत या दरवाढीचा निषेध केला आहे. पुणे काँग्रेसचे अध्यक्ष रमेश बागवे आणि नगरसेवक रवींद्र धंगेकर यांनी शहरातील मुख्य भागात याबाबत फ्लेक्स लावून मोदी सरकारवर बोचरी टीका केली आहे. ‘पेट्रोल-डिझेलची शंभरी पार केल्याबद्दल मोदी सरकारचे हार्दिक अभिनंदन’ असा टोला काँग्रेसने लगावला असून हे पोस्टर शहरात चांगलंच व्हायरल होत आहे. यात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भारतीय क्रिकेट खेळाडूच्या जर्सीमध्ये दाखवण्यात आले आहेत.
महत्वाच्या बातम्या
- पुण्यापाठोपाठ आता आणखी एका शहरात सर्व दुकाने २ वाजेपर्यंत राहणार खुली !
- १५ दिवसात १ कोटी रुपये देत माफी मागा, अन्यथा फौजदारी गुन्हा ; निलेश लंके आक्रमक
- वर्दीतील दरोडेखोर लवकरच गजाआड जातील; हसन मुश्रीफ यांचा सूचक इशारा
- मोदींनी गेल्या सात वर्षात जनतेचा विश्वास गमावला ; शिवसेना खासदाराची टीका
- आंध्रप्रदेश सरकारचा मोठा निर्णय ; बहुचर्चित आनंदैयाच्या आयुर्वेदिक औषधांना दिली मंजुरी


