Share

आंध्रप्रदेश सरकारचा मोठा निर्णय ; बहुचर्चित आनंदैयाच्या आयुर्वेदिक औषधांना दिली मंजुरी

Published On: 

कृष्णापट्टणम : देशभरात सध्या कोरोनाचा कहर पाहायला मिळत असून नागरिक कोरोनापासून बचाव व्हावा म्हणून विविध उपाय करताना देखील दिसून येत आहेत. अनेक ठिकाणी काही अघोरी पूजादेखील होताना पाहायला मिळत आहेत. तर काही ठिकाणी विविध औषधे ही कोरोनावर गुणकारी असल्याचं सांगत वाटप देखील केले जात आहे.

आंध्र प्रदेशातील कृष्णापट्टणम भागात काही दिवसांपूर्वी एक धक्कादायक प्रकार समोर आला होता. विविध वनौषधींचे मिश्रण करून हे कोरोनावरील आयुर्वेदीक औषध असल्याचं सांगून एक औषध लोकांना मोफत दिलं जात होत. हे औषध बोगिनी आनंदैया यांनी तयार केले आहे. हे औषध कोरोनावर गुणकारी असल्याने ते मिळविण्यासाठी लोकांनी तुफान गर्दी केल्याचे समोर आले होते. यावेळी लोकांनी तुफान गर्दी करून कोरोनाच्या नियमांना अक्षरशः पायदळी तुडवले होते.

हा प्रकार उघडकीस आल्यानंतर आंध्रप्रदेश सरकारने बोगिनी आनंदैया यांच्या आयुर्वेदीक औषधांवर बंदी घातली होती. परंतु आता आंध्र प्रदेश सरकारने आज आनंदैया यांनी बनविलेल्या आयुर्वेदिक औषधांच्या वितरणाला मान्यता दिली आहे. खरं तर नेल्लोर जिल्ह्यातील कृष्णापट्टणम गावात आनंदैया गेल्या एका महिन्यापासून आयुर्वेदिक पद्धतीने लोकांवर उपचार करत आहेत. कोरोनाचे आयुर्वेदिक औषध घेण्यासाठी जिल्ह्यात लोकांच्या लांबच लांब रांगा आहेत आणि लोकांनी कोरोना औषधाला ‘कृष्णपट्टनम मेडिसीन’ देखील म्हटले आहे.

मुख्यमंत्री वाय. एस. जगनमोहन रेड्डी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय केंद्रीय आयुर्वेदिक अभ्यास संशोधन समितीच्या अहवालाच्या आधारे घेण्यात आला असून, त्याअंतर्गत डॉ. आनंदैया यांच्या तीन औषधांचे वाटप करण्यास परवानगी देण्यात आलीय. ज्याला पीएल आणि एफ अशी नावे देण्यात आलीत. राज्य सरकारने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात आनंदैया चार प्रकारची औषधे आणि डोळ्याचे थेंब तयार करीत होते, त्यापैकी अद्याप डोळ्यावरचे थेंब वितरणाला सरकारने मान्यता दिली नाही, कारण त्याचा पूर्ण अहवाल अद्याप येणे बाकी आहे.

 

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!