औरंगाबाद : राज्याची पर्यटन राजधानी म्हणून ओळख असलेल्या औरंगाबाद शहरातील रस्त्यावरुन मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने महानगरपालीकेला चांगलेच खडसावले आहे. शहरात पाण्याची समस्या फार गंभीर असून कोरोना संसर्गामुळे रोजगाराचाही नवीन प्रश्न उभा राहीला आहे. यासाठी किमान शहरातील रस्ते चांगले करा जेणेकरुन पर्यटन वाढेल आणि शहरातील तरुणांना रोजगार मिळेल. असे खंडपीठाने सुचवीले.
कोरोनाचे संकट टळत असले तरी शहरातील दुचाकीस्वार आणि पादचारी यांना मास्क साठी सक्ती करावी. शहरात आधीच पाण्याची टंचाई आहे. रोजगाराची समस्या आहे. शहरात ऐतिहासिक वास्तू बघण्यासाठी देश-विदेशातून पर्यटक येतात. त्यांना त्या वास्तूंकडे नेणारे रस्ते चांगले तयार केले तर शहराचे नाव त्यांच्या तोंडी राहील. यातून पर्यटनाला चालना मिळेल. रोजगारनिर्मिती होईल. असे मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती टी. व्ही. नलावडे व एम. जी. शेवलीकर यांनी महापालिकेला सुचवले.
शहरातील नागरी समस्या विषयी २००१ मध्ये दाखल करून घेतलेली सुमोटो जनहित याचिकेच्या सुनावणीस मनपा प्रशासक, पोलिस आयुक्तांना खंडपीठात हजर राहण्याचे आदेश निघाले होते. त्यानुसार मनपा प्रशासक आस्तिककुमार पांडेय, पोलिस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता दोघेही बुधवारी सुनावणीला उपस्थित होते. यात शहरातील विकास कामे मुदतीत करावी. मनपा प्रशासनाने मोठ्या प्रयत्नाने सायकल ट्रॅक तयार केला, त्याचे कौतुक आहे. परंतु या ट्रॅकचा उपयोग वाहनतळासाठी होत आहे. उड्डाणपुलाखाली केलेली रंगरंगोटी चांगली आहे. असे नवीन प्रयोग सातत्याने केले जावेत असे खंडपीठाने सुचवले
महत्वाच्या बातम्या
- ‘महाराष्ट्र देशा’चा इम्पॅक्ट, बातमीनंतर जलवाहिनीच्या कामाची रक्कम भरली
- राज्यपाल नाही, मी तर राज्यसेवक आहे :भगतसिंह कोश्यारी
- ‘…त्यावेळी मुजोर ब्रिटिश सरकारलाही शेतकऱ्यांसमोर झुकावे लागले होते’
- परभणीत एसबीआय बँकेचे एटीएम फोडून 12,500 लंपास; नानलपेठ पोलिसांत गुन्हा दाखल
- ‘भविष्यात राष्ट्रीय समाज पक्ष किंगमेकर ठरेल’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

