Share

‘भविष्यात राष्ट्रीय समाज पक्ष किंगमेकर ठरेल’

Published On: 

🕒 1 min read

सातारा : राष्ट्रीय समाज पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा सातारा नगरपालिकेच्या मंगल कार्यालयात आज पार पडला. यावेळी पक्षाचे अध्यक्ष व माजी पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर उपस्थित होते. माध्यमांशी संवाद साधताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाप्रमाणे भविष्यात राष्ट्रीय समाज पक्ष किंगमेकर ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

‘राष्ट्रीय समाज पक्षाची ताकद देशात वाढण्याचे काम सुरू आहे. महाराष्ट्राबरोबरच बाहेरच्या राज्यातही पक्षाला प्रतिष्ठा मिळत आहे. आगामी काळात राज्याच्या विधानसभेत रासपचे आमदार निवडून आणण्याचे नियोजन केले आहे. सातारा जिल्ह्यात फलटण व माण विधानसभा मतदारसंघावर रासपने लक्ष केंद्रित केलेले आहे. या दोन्ही तालुक्यात पक्षाची ताकद मोठी आहे. या दोन्ही मतदारसंघांत रासपचे आमदार निवडून येतील’ असे महादेव जानकर म्हणाले आहेत.

दरम्यान, कृषी कायद्यांमुळे सुरु असलेल्या वादंगावरही जानकर यांनी भाष्य केले आहे. ‘काँग्रेसचे कृषी कायदे चुकीचे असल्यानेच देशात आणि राज्यात मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. या आत्महत्या रोखण्यासाठी व शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य मिळवून देण्यासाठी केंद्र सरकारने कायदे केले आहेत. या विधेयकामुळे शेतकऱ्यांचा लाभच होणार आहे’ असे म्हणत त्यांनी कृषी कायद्यांचे समर्थन केल आहे.

पुढे दुध दराबाबत भाष्य करतान जानकर यांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे. ‘पशुसंवर्धन मंत्री असताना गायीच्या व म्हशीच्या दुधाला दर वाढवून दिला. आता भाजप व मित्र पक्षांचे सरकार सत्तेवर नाही. महाविकास आघाडीचे सत्तेवर आहे’, असे म्हणत सरकारची नियत चांगली नसल्याचा आरोप देखील जानकर यांनी केला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!