Share

परभणीत एसबीआय बँकेचे एटीएम फोडून 12,500 लंपास; नानलपेठ पोलिसांत गुन्हा दाखल

Published On: 

परभणी : शहरातील क्रांती चौकातील असलेले एसबीआय बँकेचे एटीएम फोडून त्यातील 12,500 रुपयांची रक्कम चोरल्याची घटना मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. या प्रकरणी बुधवारी नानलपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेनंतर बँकेच्या एटीएमवर देखरेख ठेवणाऱ्या ईपीएस कंपनीच्या चॅनल मॅनेजर अंकुश हुलेकर यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. फिर्यादीनुसार ते म्हणाले की, ईपीएस या कंपनीत मी चॅनल मॅनेजर म्हणून कार्यरत असून शहरातील बँकांच्या एटीएमवर मोबाईल एप्लिकेशनव्दारे देखरेख ठेवतो. मंगळवारी रात्री साडेबाराच्या सुमारास आपल्या एप्लिकेशनमध्ये एक कॉल दिसला. त्यात क्रांती चौकातील एटीएममध्ये कॅश हँडलर नावाचा एरर आला. त्यावरून एटीएममध्ये कॅश टाकणाऱ्या व्यक्तींना मी तो एरर पाठवला. त्यावेळी आनंद बाळशंकर, विशाल बेंडे यांनी एटीएममध्ये जाऊन पाहिले असता मशीनला एरर असल्याचे सांगितले. त्यानंतर मी स्वत: तेथे जाऊन पाहिले असता एटीएम नादुरुस्त झाल्याचे दिसले.

त्यामुळे एटीएममधील रक्कम मोजली असता ती 21 लाख 39 हजार रुपयांपैकी 21 लाख 26 हजार 500 रुपये एवढीच आढळली. रकमेत 12 हजार 500 रुपये कमी असल्याचे दिसून आले. मंगळवारी रात्री साडेबाराच्या सुमारास कोणीतरी अज्ञात व्यक्तीने क्रांती चौकातील एसबीआय बँकेच्या एटीएम फोडून 12 हजार 500 रुपये रक्कम लांबवल्याचे म्हटले आहे. हुलेकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून नानलपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!