Share

विराट कोहलीवरचे मोठे ओझे हलके झाले; माजी खेळाडूचे विधान

Published On: 

नवी दिल्ली : भारताचा माजी यष्टीरक्षक सबा करीमने महान फलंदाज विराट कोहलीवर मोठी प्रतिक्रिया दिली आहे. विराट कोहलीने अलीकडेच सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत. ज्यात तो दक्षिण आफ्रिकेत कसोटी मालिका सुरू होण्यापूर्वी कठोर प्रशिक्षण घेत असल्याचे दिसून येत आहे. प्रशिक्षण घेत असताना कोहलीच्या चेहऱ्यावर एक वेगळेच तेज दिसत आहे. यावरच सबा करीम म्हणाला की, कोहलीला त्याच्या प्रशिक्षण सत्राचा पुरेपूर आनंद घेताना पाहून आनंद झाला. तसेच त्याच्याकडे पाहून वाटत आहे त्याच्यावरचे काही ओझे कमी झाले आहे.

बीसीसीआयने आपल्या ट्विटर हँडलवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे, ज्यामध्ये संघाचे सदस्य नेटवर सराव करताना दिसत आहेत. व्हिडिओच्या सुरुवातीला खेळाडू मैदानात वॉर्म अप करताना दिसत होते. नेटमध्ये फॉरवर्ड बचावात्मक शॉट खेळल्यानंतर कर्णधार कोहली प्रशिक्षक राहुल द्रविडशी गप्पा मारताना दिसला. सलामीवीर आणि उपकर्णधार केएल राहुल पुल शॉट्स खेळण्यात व्यस्त दिसले तर अजिंक्य रहाणे आणि श्रेयस अय्यर यांनीही नेटमध्ये घाम गाळला आहे. राहुलप्रमाणेच रविचंद्रन अश्विननेही पुल शॉटचा सराव केला. ऑफस्पिनरने नेट सत्रात गोलंदाजीचा सरावही केला.

एका पसिद्ध वृत्तसंस्थेसी संवाद साधत असताना सबा करीम म्हणाले, विराट कोहलीच्या डोक्यावरून मोठं ओझं उतरल्याचं दिसतंय. आता तो खुल्या मनाने खेळू शकतो आणि कसोटी कारकिर्दीची नव्याने सुरुवात करू शकतो. आता त्याच्याकडून अपेक्षा आहेत. जर त्याने खुल्या दृष्टिकोनाने फलंदाजी केली तर तो पुन्हा फॉर्ममध्ये येऊ शकतो. सराव सत्रात त्याने ज्या प्रकारचा फॉर्म दाखवला, तोच फॉर्म तो सामन्यात दाखवेल, असा मला विश्वास आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!