पुणे : मनसेमधून बाहेर पडून राष्ट्रवादीमध्ये नव्याने पदापर्दण केलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे (Rupali Patil Thomabre) यांनी राष्ट्रवादीमध्ये सक्रिय झाल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी टीका केली होती. त्यांच्या टीकेला उत्तर देताना रुपाली पाटील यांनी चंद्रकांत पाटलांवर जोरदार टीका केली आहे.
काल पुण्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आले होते. यावेळी एका कार्यक्रमामध्ये बोलताना चंद्रकांत पाटलांनी राष्ट्रवादी आणि शरद पवारांवर सडकून टीका केली आहे. पंतप्रधानपदाची स्वप्न पाहणाऱ्या पक्षाला जे जमलं नाही ते भाजपने करुन दाखवलं. देशाच्या पंतप्रधानपदाची स्वप्न पाहणाऱ्या पक्षालाही या महाराष्ट्रात 60च्या वर आमदार निवडून आणता आले नाही, असे चंद्रकांत पाटील म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील यांनी टीका केली आहे.
शरद पवार साहेबांवर टीका करण्यासाठी एका राष्ट्रीय पक्षाने नेमलेल्या राज्याच्या अध्यक्षाला स्वतःच्या मतदार संघात आमदार होता आले नाही. पुरात वाहून आलेले पुण्याचे स्वयंघोषित दादा, असं म्हणत रुपाली पाटील यांनी चंद्रकांत पाटलांवर निशाणा साधला आहे.
खा.शरद पवार साहेबांच्या वर टीका करण्यासाठी एका राष्ट्रीय पक्षाने नेमलेल्या राज्याच्या अध्यक्षाला स्वतःच्या मतदार संघात आमदार होता आले नाही ; पुरात वाहून आलेले पुण्याचे स्वयंघोषित दादा
— Rupali patil thombare (@Rupalispeak) December 20, 2021
महत्वाच्या बातम्या
- ”दोन महिन्यांपासून पठ्ठ्या कुठंय?”; दानवेंची मुख्यमंत्र्यांवर एकेरी भाषेत टीका
- ‘..तर भाजपने आपल्या १०५ आमदारांचे राजीनामे द्यावेत आणि निवडणूक लढवून दाखवावी’
- खडसेंनी आता दुकानदारी बंद करावी- गिरीश महाजन
- योगी सरकारचे पाच वर्ष फक्त ‘ट्रेलर’ खरी फिल्म तर..’ नितीन गडकरींनी केले तोंडभरून कौतुक
- …पण ह्या राष्ट्रवादी आमदार राजू नवघरेचं काय करायचं? नितेश राणेंचा टोला


