Share

‘त्या’ पार्टीत कोण मंत्री होते हे जाहीर करा, अन्यथा…; पेडणेकरांचं शेलारांना आव्हान

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : काही दिवसांपूर्वी बॉलिवूड अभिनेत्री करिना कपूर आणि अभिनेत्री अमृता अरोरा यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे करण जोहरने आयोजित केलेली पार्टी चांगलीच चर्चेत आली आहे. या पार्टीला राज्य मंत्री मंडळातील मंत्री उपस्थित होते. असा आरोप भाजप नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी केला होता. आज आशिष शेलार यांच्या या आरोपाला मुंबई महानगरपालिकेच्या महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar ) यांनी आव्हान दिले आहे.

आम्ही शिवसेनेच्या रणरागीणी आहोत. खोटे आणि बेछुट आरोप आम्ही खपवून घेणार नाही. मंत्र्यांना बदनाम करण्याचे काम सुरू असून खोटे बोलून जनतेची दिशाभूल केली जात आहे. परंतु, जनतेलासुद्धा आता तुमचा खोटारडेपणा समजला आहे, असे म्हणत किशोरी पेडणेकर यांनी आशिष शेलार यांना खडसावले आहे. ‘खोटे आरोप करू नका, त्या पार्टीत जे मंत्री सहभागी झाले होते. ते सिद्ध करा नाहीतर जनतेची माफी मागा’, असे आव्हान किशोरी पेडणेकर यांनी आशिष शेलार केले आहे.

कोरानाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे निष्काळजीपणा करून चालणार नाही. करण जोरहच्या पार्टीत सहभागी सेलेब्रिटींवर पालिकेने योग्य कारवाई केली आहे. परंतु, शेलार यांनी त्या पार्टीला राज्य मंत्री मंडळातील एक मंत्रीही उपस्थित होते असा अरोप केला होता. लोकशाहीने अधिकार दिले आहेत. त्याचा अपमान करू नका. आशिष शेलार आणि भाजपचे नेते खोटे बोलण्याची एकही संधी सोडत नाहीत. खोटं बोल पण रेटून बोल, अशी वृत्ती वाढत आहे,  असंही किशोरी पेडणेकर यावेळी म्हणाल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!