🕒 1 min read
मुंबई: शिवसेना आणि एकनाथ शिंदे यांच्यातील सत्ता संघर्षाचा वाद थेट सुप्रीम कोर्टात पोहोचला आहे. शिवसेनेशी बंड करत सत्तास्थापन करणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि शिंदे गटावर शिवसेनेने अपात्रतेची कारवाई केली होती, याला शिंदे गटाने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. तसेच अजय चौधरींच्या गटनेतेपदी नियुक्तीला आव्हान देणाऱ्या याचिका शिंदे गटाने सर्वोच्च न्यायालयात केल्या आहेत. यावर ११ जुलैच्या सुनावणीत पुढील सुनावणी होईपर्यंत आमदारांवर कोणतीही कारवाई होऊ नये असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. तसेच सदरील प्रकरण सरन्यायाधीश रमण यांनी खंडपीठ स्थापन करून सुनावणी केली जाईल, असे स्पष्ट केले होते.
दरम्यान बुधवारी (२० जुलै) सरन्यायाधीश रमण, न्या. कृष्णा मुरारी आणि न्या. हिमा कोहली यांच्या खंडपीठापुढे सुनावणी होणार आहे. या सुनावणीत सर्वोच्च न्यायालय शिवसेनेतील बंडखोरी ते राज्यातील सत्तांतर आणि विधानसभेतील बदलांची कायदेशीर वैधता यावर सुनावणी देईल.
‘या’ दोन मुद्द्यांवर न्यायालय काय निर्णय देणार?
गटनेता आणि प्रतोद नेमण्याचे अधिकार बहुसंख्य आमदार असलेल्या गटाला आहेत कि, मूळ पक्षाला आहेत हा सर्वांत महत्वाचा मुद्दा असून दुसरा म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या बरोबरचे आमदार आहेत तोच विधिमंडळ पक्ष आहे कि दोन तृतीयअंश आमदार बाहेर पडल्यामुळे तो वेगळा गट निर्माण झाला आहे. यासंदर्भात न्यायालय काय निर्णय देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महत्वाच्या बातम्या:
- Nitesh Rane : सेनेचा NDA ला पाठींबा असताना राऊत विरोधकांसोबत का? ; राणे बंधूंनी ‘निष्ठावंत’ म्हणत डिवचले
- Sanjay Raut : ‘प्रेमरोगा’ने वासू-सपनाच्या राजकीय संसाराचे काय होणार?; शिवसेनेची शिंदे-फडणवीसांवर टीका
- IND vs ENG : ऋषभ पंतचा शतकी तडाखा अन् हार्दिक पंड्याची अष्टपैलू खेळी; भारताचा ५ गडी राखून विजय
- IND vs ENG : हार्दिक पंड्याच बेस्ट! दमदार बॉलिंगमुळे सोशल मीडियावर प्रतिक्रियांचा वर्षाव
- PV Sindhu : पीव्ही सिंधूच्या बलाढ्य यशानंतर पंतप्रधान मोदींनी केले अभिनंदन
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
