Share

Thackeray vs Shinde | “विधानसभा अध्यक्ष राजकीय पैलूंची…” ; शिंदे गटाचे वकील कोर्टात काय म्हणाले?

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली : न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील पाच न्यायाधीशांच्या घटनापीठासमोर आज शिवसेना विरुद्ध शिवसेना खटल्याची सुनावणी सुरु आहे. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे आमने-सामने आले आहेत. त्यामुळे शिवसेना कुणाची, धनुष्यबाण कुणाचा तसेच १६ आमदारांच्या अपात्रतेबाबत आज निर्णय होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, शिंदे गटाचे वकील नीरज कौल यांनी विधानसभा अध्यक्षांकडे अपात्रतेचा निर्णय व्हावा, असा युक्तिवाद न्यायालात केला. सध्या विधानसभा अध्यक्ष नियुक्त आहेत, असे कौल यांनी म्हटले आहे. आम्ही स्वताहून पक्ष सोडला नाही, त्यामुळे विधानसभा अध्यक्षांनी याबाबत निर्णय घ्यावा, असे कौल म्हणाले. यावेळी कौल यांनी समाजवादी पक्षाचा दाखला दिला. नवीन सरकार सत्तेत आल्यानंतर राहूल नार्वेकर यांना विधानसभा अध्यक्ष करण्यात आले आहे.

तसेच कोणाकडे कीती पदाधिकारी आहेत, हे पाहावे लागेल, असा युक्तिवाद कौल यांनी केला आहे. हे निवडणूक आयोगाला लक्षात घ्यावा लागेल. चिन्हाचा निर्णय देखील निवडणूक आयोग ठरवू शकतो, असे कौल म्हणाले. तसेच विधानसभा अध्यक्ष राजकीय पैलूंची चौकशी करू शकत नाहीत, असं कोर्टानं म्हटलेलं आहे, याची आठवण कौल यांनी करुन दिली.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Maharashtra Marathi News Mumbai Politics

Join WhatsApp

Join Now

🕘 संबंधित बातम्या