Share

प्रत्येक जिल्ह्याच्या मुख्यालयी ओबीसी विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहे सुरू करणार-विजय वडेट्टीवार

Published On: 

🕒 1 min read

गडचिरोली : राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी एक मोठी घोषणा केली आहे. आता राज्यातील प्रत्येक जिल्ह्याच्या मुख्यालयी ओबीसी विद्यार्थ्यांसाठी वस्तीगृहे सुरू करण्याचा निर्णय महाज्योतीच्या माध्यमातून घेतला आहे. अशी घोषणा मंत्री वडेट्टीवार यांनी केली आहे.

त्यामुळे आता ओबीसी प्रवर्गातील ज्या विद्यार्थ्यांना शासकीय वस्तीगृहाचा लाभ मिळत नाही,अशा विद्यार्थ्यांसाठी प्रति विद्यार्थी, प्रति वर्ष ४३ हजार रुपये प्रमाणे लाभ देण्याचे नियोजन केले आहे. तसेच वैद्यकीय,अभियांत्रिकी, तंत्रनिकेतन अभ्यासक्रमानुसार गुणवत्ता निकषावर यासाठी निवड करण्यात येणार आहे. अशी घोषणाही मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.

 

१०० मुलींसाठी तर १०० मुलांसाठी आता होस्टेल निर्माण केले जाणार आहे. खाते कोणतेही असो त्यातून न्याय देता येईल का, याचा विचार सरकार अगोदर करते. यासठी त्यांनी ब्रह्मपुरी येथे अधिकाऱ्यांची बैठक घेतली. तसेच ५०० मुलांना स्वआधार योजनाही राबवण्यात येणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!