मुंबई : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे. राज्यपालांनी आपल्या पत्रात मुंबईतील साकीनाका अत्याचार प्रकरणावरून कायदा सुव्यवस्थेकडे लक्ष वेधले. तसेच कायदा सुव्यवस्थेबाबत मुख्यमंत्र्यांना दोन दिवसांचे विशेष अधिवेशन बोलावण्याची सूचना केली आहे. राज्यातील महिला सुरक्षा, कायदा व सुव्यवस्था आणि दिशा कायद्याबाबत विषयांवर चर्चा करण्यात यावी, असे राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले आहे. तसेच याच विषयांवर चर्चा करण्यासाठी दोन दिवसांचे एक अधिवेशन बोलवावे, असेही या पत्रात म्हटले आहे.
यावर राज्यपालांना अधिवेशन बोलाविण्याचा कायदेशीर अधिकार आहे. मात्र, नैतिक अधिकार आहे का? असा प्रश्न शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी उपस्थित केला आहे. राज्यपालांनी सरकारचा हक्क असणारे १२ नामनिर्देशित आमदारांची नियुक्ती केलेली नाही. त्यामुळे त्यांनी अधिवेशनासंदर्भातील मागणी करण्याचा हक्क गमावल्याची टीका सावंत यांनी माध्यमांशी बोलताना केली.
‘राज्यपालांचे निर्देश देण्याचे अधिकार असू शकतात. मात्र त्यांना हा नैतिक अधिकार आहे का हा माझा प्रश्न आहे. अशी अधिवेशनं घ्यायची झाली तर उत्तर प्रदेशात रोज अधिवेशन घ्यावं लागेल’ असे मत त्यांनी व्यक्त केले. साकीनाका प्रकरणाचा तपास ट्रॅकवर असून गुन्हेगाराला अटकही झाली आहे. अटक आणि कारवाई झाली नसती तर वेगळी गोष्ट होती.बाकी ज्या गोष्टी ते बोलतायत ते केंद्र सरकारने सर्व राज्यांना सांगितलं पाहिजे, असेही सावंत म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘गीतेंच्या वक्तव्याचा सरकारशी काही संबंध नाही’, संजय राऊत यांची प्रतिक्रिया
- ‘शिवसैनिकांची नार्को टेस्ट करा, आघाडी नको असाच आवाज येईल’; सुधीर मुनगंटीवार यांची टीका
- ‘राज्यात आघाडी सरकार असले तरीही आम्ही आघाडी सैनिक नाही आहोत,आम्ही शिवसैनिकच आहोत’
- राष्ट्रवादीचा जन्मच कॉंग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसून झालाय-अनंत गीते
- चंद्रकांत पाटील यांनी स्वत: खाल्ले पण दिसू दिले नाही; नाना पटोले यांचा घणाघात
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

