Share

पंकजा मुंडेंच्या साखर कारखान्यात चोरी करणारा ‘तो’ भामटा निघाला राष्ट्रवादीच्या नगरसेविकेचा पती…

Published On: 

बीड: भाजप नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे यांचा बीड जिल्ह्यतील परळी तालुक्यातील वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना कधी दुर्घटना, तर कधी कामगारांचे पगार नेहमीच अशा काही ना काही कारणांमुळे चर्चेत असतो. यावेळी पुन्हा मुंडेंचा हा कारखाना चर्चेत आला आहे. तो कारखान्याच्या वर्कशॉप आणि स्टोअरमध्ये झालेल्या मोठ्या चोरीमुळे

कारखान्याच्या वर्कशॉप आणि स्टोअरमधून तब्बल 37 लाख 84 हजार रुपयांचं साहित्य चोरी गेल्याची माहिती समोर आली होती. या प्रकरणी 22 डिसेंबरला परळी ग्रामीण पोलिस ठाण्यात अज्ञातांविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला. या गोडाऊनमध्ये 17 ऑक्टोबर 2020 ला हि चोरी झाली होती.

मात्र आता या चोरी प्रकरणाला ने वळण मिळाले आहे. पंकजा मुंडे यांचं वर्चस्व असलेल्या वैद्यनाथ साखर कारखान्यात झालेल्या चोरीप्रकरणी चक्क राष्ट्रवादीच्या नगरसेविकेच्या पतीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अजीज इस्माईल शेख उर्फ मंगलदादा असं आरोपीचं नाव आहे. त्याच्यावर या चोरी प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. अजीज शेख सध्या फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. सध्या पोलिसांनी अजीज शेखच्या मुलाला ताब्यात घेतलं आहे

या चोरीमध्ये एकूण 37 लाख 84 हजार रुपयांचं साहित्य चोरट्यांनी लंपास केल होत. त्यात कारखान्याचे संगणक, कपर मटेरियल, मिल बेअरिंग, बुश साऊंड बार अशा अनेक वस्तूंचा समावेश आहे. त्यानंतर पोलिसांनी अज्ञात चोरट्याचा तपास सुरु होता. या चोरी प्रकरणात राष्ट्रवादीच्या नगरसेविकेच्यासह परळी पोलिसांनी 4 संशयितांना ताब्यात घेतलं आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!