Share

आपल्या बापाच्या चेहऱ्यावर जे सुख दिसतंय, ते पवार साहेबांमुळेचं’

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा- आज दुसऱ्या दिवशी शिवस्वराज्य यात्रेचे अहमदनगरमध्ये भव्य स्वागत झाले. यात्रेला नगरवासियांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते यावेळी सरकारवर ताशेरे ओढले. या सरकारच्या काळात १५ हजाराहून जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, बेरोजगारीने तोंड वर काढले आहे, राज्यातील वातावरण औद्योगिक क्षेत्रासाठी पोषक नाही, सरकारने राज्याला कर्जबाजारी केले आङे, हे या सरकारचे अपयश आहे, अशी टीका पवार यांनी केली. राज्यात एक विचित्र परिस्थिती सरकारने निर्माण करून ठेवली आहे. ही परिस्थिती बदलण्यासाठी शिवस्वराज्य यात्रा काढली असल्याचे अजित पवार म्हणाले.

खा. अमोल कोल्हे यांनीसुद्धा मुख्यमंत्र्यांच्या अपयशाचा पाढा वाचत सारकारवर निशाणा साधला. आज राज्यात पूर परिस्थिती असताना मुख्यमंत्री महाजनादेश यात्रा काढण्यात व्यस्त आहेत. अजितदादांनी यांची जाणीव करून दिली आणि आज मुख्यमंत्र्यांनी आपली यात्रा थांबवली. आज काही लोक सोशल मीडियावर खा. शरद पवार साहेबांनी काय केले, असे प्रश्न विचारत आहेत. मात्र, आज महाराष्ट्र कृषी क्षेत्रात प्रगत आहे, भारत निर्यातदार देश बनला आहे, आपल्या बापाच्या चेहऱ्यावर जे सुख दिसतंय, ते पवार साहेबांमुळे आहे, असे कोल्हे म्हणाले.

युवा नेते आ. संग्राम जगताप यांनी सभेत नगरकरांचे आभार मानले. नगरकरांचे प्रेम आणि आशीर्वाद आहेत म्हणून कोणीही आपले काहीही वाकडे करू शकले नाही, असे ते म्हणाले. या सभेला राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या अध्यक्ष फौजिया खान, आ. विद्या चव्हाण, जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, कार्याध्यक्ष सुरज चव्हाण, रविकांत वर्पे व कार्यकर्ते उपस्थित होते.

पिचडांनी शेतकऱ्यांची जमीन लाटली, धनंजय मुंडेंचा आरोप

मराठा आरक्षण संविधान आणि समाजामुळेच, कोणीही राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न करू नये – पवार

जय महाराष्ट्र म्हणण्यासाठी मला दोन दिवस सराव करावा लागला : सचिन अहिर

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!