जुन्नर : मराठा समाजाला मिळालेले आरक्षण हे लाखोंच्या मोर्चानंतर मिळालेले आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला दिलेल्या संविधानामुळे समाजाला न्याय मिळाला, त्यामुळे कोणीही त्याचे राजकीय श्रेय घेण्याचा प्रयत्न करू नये, अशी टीका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सत्ताधारी भाजपवर केली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून काढण्यात आलेल्या शिवस्वराज्य यात्रेला आज जुन्नर येथून सुरुवात झाली, यावेळी आयोजित सभेत पवार बोलत होते.
कोणी थांबेल कोणी थांबणार नाही, याचा आता विचार करायचा नाही, शरद पवार यांनी कधीकाळी सहाचे साठ आमदार केले होते, त्यामुळे आपणही जनतेच्या आशीर्वादाने सत्तेत येऊ, असा विश्वास अजित पवार यांनी यावेळी व्यक्त केला. दरम्यान, सत्ताधारी भाजप – शिवसेनेचे नेते २२० जागा जिंकणार असल्याचे सांगत असले, तरी कोणत्याही परिस्थितीत राज्यात आघाडीच्या १७५ जागा निवडून आणत सत्ता मिळवायची, असही पवार यावेळी म्हणाले.
शिवनेरीवर महाराजांचे आशीर्वाद घेऊन शिवस्वराज्य यात्रेला सुरुवात
एका बाजूला भाजपा आणि शिवसेनाने जनसंपर्क साधण्यासाठी वेगवेगळ्या यात्रांचे आयोजन केले आहे. तर याला प्रत्युत्तर म्हणून राष्ट्रवादी कॉंग्रेसने शिवस्वराज्य यात्रेचे आयोजन केले आहे.राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी शिवनेरी गडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पायी नतमस्तक होऊन शिवस्वराज्य यात्रेला प्रारंभ केला आहे. या यात्रेनिमित्त अमोल कोल्हे संपूर्ण राज्यात फिरणार आहेत.
खासदार अमोल कोल्हे यांची लोकप्रियता पाहून राष्ट्रवादी कॉंग्रेसने त्यांच्यावर शिवस्वराज्य यात्रेची जबाबदारी सोपवली आहे. या यात्रेद्वारे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला पुन्हा बळ आणण्यासाठी अमोल कोल्हे प्रयत्न करणार आहेत. सामान्य नागरिकांमध्ये खासकरून तरुणांमध्ये अमोल कोल्हे चांगलेच प्रसिद्ध आहेत. कोल्हे यांच्या या यात्रेचा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला फायदा होणार का हे पहाव लागणार आहे.
राज्यात पावसाचा कहर; खान्देशाला पुराचा सर्वाधिक फटका, अनेक गावं पाण्याखाली
ज्येष्ठ नेते गळाला लागण्यासाठी, आम्ही आधी त्यांच्या मुलांना पक्षात घेतले : मुख्यमंत्री फडणवीस
‘मावळमध्ये पराभव होऊ शकतो तर बारामतीत अवघड नाही’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

