Share

जय महाराष्ट्र म्हणण्यासाठी मला दोन दिवस सराव करावा लागला : सचिन अहिर

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या अनेक नेत्यांनी भाजप-सेनेत प्रवेश केला आहे. तसेच राष्ट्रवादीचे मुंबईचे अध्यक्ष सचिन अहिर यांनी देखील शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे मुंबईमध्ये राष्ट्रवादीला भगदाड पडले आहे. मात्र शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन विचारसरणींशी जुळवून घेताना काय फजिती होत आहे. याचा एक प्रसंग सचिन अहिर यांनी एका वृत्त वाहिनीला शेअर केला आहे.

ते म्हणाले की, शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर मला सुरवातीला दोन दिवस जय महाराष्ट्र बोलण्यासाठी सराव करावा लागला. मला एका माझ्या मित्राचा फोन आला. त्यांना मी ‘जय महाराष्ट्र’ म्हणालो, मात्र ते म्हणाले आम्हाला सचिन अहिर यांच्याशी बोलायचे आहे. त्यावर मी देखील चमकलो. मी सचिन अहिरचं बोलत आहे, असे सांगावे लागले. त्यामुळे समोरचा मित्र देखील चमकला.

सचिन अहिर हे नुकतेचं शिवसेनेत दाखल झाले आहेत. त्यामुळे शिवसेनेच्या एक कार्यकर्त्याचे ज्या प्रमाणे आचरण असते. ते अंगीवळणी करण्यासाठी त्यांना कसरत करावी लागत असल्याचं दिसत आहे. यावेळी अहिर यांनी आदित्य ठाकरे यांच्या नव महाराष्ट्राच्या स्वप्नाचे कौतुक केले. ज्या प्रमाणे आदित्य ठाकरे नव महाराष्ट्राची स्वप्न पाहत आहेत. त्याप्रमाणे काम करत आहेत, ते पाहिलं तर कोणताही नेता परिवर्तन करेल. त्यामुळे मी शिवसेनेत आलो आहे, असे सचिन अहिर यावेळी म्हणाले.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!